लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज )
मुंबई: महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी पत्रकारांशी वर्षा निवासस्थानी संवाद साधला. यावेळी त्यांनी महत्त्वाचे स्टेटमेंट केले.
यावेळी आगामी विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात बोलताना ते म्हणाले की, निवडणुका साधारणतः नोव्हेंबरच्या दुसर्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. तसेच यावेळी ही निवडणूक दोन टप्प्यांत होण्याची शक्यता आहे.
नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात दिवाळी येत आहे. त्यामुळे दिवाळी नंतरच निवडणुका होतील. त्यासाठी ऑक्टोबर च्या दुसर्या किंवा फारतर तिसऱ्या आठवड्यात आचार संहिता लागू शकते.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. लोकसभा निवडणुकीतील परफॉर्मन्स आणि उमेदवाराची निवडून येण्याची क्षमता हे जागा वाटपाचे सूत्र असेल, असेही ना. शिंदे यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीत शिंदे शिवसेनेचे 15 पैकी 7 जागांवर विजय मिळविला होता. याचा उपयोग विधानसभा निवडणुकीत करता येईल. शिवसेना, भाजप व राष्ट्रीय समाज पक्ष महायुतीच्या जागा वाटपाच्या फायनल निर्णयाची घोषणा लवकरच केली जाईल, असेही शिंदे यांनी सांगितले.
दरम्यान निवडणुकी बाबत अंतिम निर्णय निवडणुक आयोगाचा असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. निवडणूक तयारीच्या कामाला प्रशासन लागले असून राजकिय पटलावर प्रत्येक पक्षातील हालचाली गतिमान झाल्या आहेत.
0 टिप्पण्या