Ticker

6/Breaking/ticker-posts

शेवगाव- पाथर्डी विधानसभा मतदारसंघात इच्छुकांचे गुडघ्याला बाशिंग









लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

(विक्रम केदार)

  शेवगाव- पाथर्डी विधानसभा मतदारसंघातून होऊ घातलेल्या विधानसभेचे निवडणूक लढवण्यासाठी विद्यमान आमदार मोनिका राजळे भाजपकडूनराष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडूनसंघर्ष योद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष ॲड. प्रतापराव ढाकणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांना प्रथम साथ देत गेल्या तीन चार वर्षापासून मतदार संघातील प्रत्येक गाव वाडी वस्तीवर शिवार फेरी काढत मतदाराशी थेट संवाद साधत आहेत त्याच बरोबर त्यांचे पुत्र केदारेश्वरचे अध्यक्ष ऋषिकेश ढाकणे पत्नी प्रभावती  ढाकणे मतदारसंघात जनतेच्या संपर्कात आहेत.

प्रतापराव ढाकणे यांनी उमेदवारी निश्चित मानून संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष ऋषिकेश ढाकणे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य प्रभावती ढाकणे या गौरी गणपती उत्सव सुखदुःखा प्रसंगात भेटीगाठी देत मतदार संघात संपर्कात आहेत.  तसेच दोन विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्याने प्रताप ढाकणे यांच्याबद्दल आज जनतेत सहानुभूती आहे.


विद्यमान आमदार मोनिका राजळे  या दहा वर्ष आमदार काळात केलेली विकास कामे जनतेसमोर मांडत आहेत.  मतदारसंघाचा दौरा करत असून मात्र स्व पक्षातून होत असलेल्या तीव्र विरोधात कुठलीही भाष्य न करता पक्ष नेतृत्वावर विश्वास आहे. उमेदवारी आपल्यालाच मिळेल राष्ट्रीय नेते अमित शहा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यावर विश्वास ठेवून उमेदवारी आपल्यालाच आहे असे सांगून त्या दृष्टीने विधानसभेच्या निवडणुकीच्या कामाला लागल्या आहेत..

माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून उमेदवारीसाठी जोरदार प्रयत्नात आहेत पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्यास वेळप्रसंगी कोणत्याही परिस्थितीत अपक्ष निवडणुक लढविण्यासाठी जोरदार तयारीत सुरू केली असून मतदारसंघात चा परिवर्तन दौरा जोरात सुरू आहे, शेवगाव पाथर्डी मतदारसंघात दहा वर्षांपूर्वी झालेल्या पराभवानंतर घुले यांचा संपर्क कमी झाला होता परंतु आता शेवगाव मतदार संघाचा विविध कार्यक्रमा निमित्त गाठीभेटी  निवडणूक लढविण्यासाठी व्यूहरचना सुरू केली आहे तसेच भाजपाचे माजी जिल्हा अध्यक्ष अरुण मुंडे यांनी शेवगाव येथे मूळ निष्ठावंत व भाजपच्या लोकनेत्या आ पंकजा मुंडे यांना मानणाऱ्या समर्थकांचा भव्य मेळावा घेत शक्ती प्रदर्शन केले. आ. मोनिका राजळे यांच्यावर जोरदार टीका करत कोणत्याही परिस्थितीत भाजपची उमेदवार आपल्यालाच मिळेल असा दावा करत विधानसभा निवडणुकीचे रणसिंग फुंकले गेले आहे. 


जि. प. च्या माजी सदस्य हर्षदा काकडे या भाजप व शरद पवार राष्ट्रवादी कडून उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत. पक्षाची उमेदवारी न मिळाल्यास  अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. 

  

भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष गोकुळ दौंड भाजपची उमेदवारीसाठी प्रयत्नशील असून मतदारसंघाचा दौरा करत आहेत आमदार मोनिका राजळे यांच्याशी त्यांचे पक्षांतर्ग तीव्र विरोध असून त्यांना डावलून मतदारसंघात मतदारांच्या स्वतंत्र गाठीभेटी घेण्यात स्वतःच्या भाजपाकडून उमेदवारीसाठी जोरदार प्रयत्नशील आहेत 

तसेच वंचित बहुजन आघाडी कडून प्रा किसन चव्हाण यांनी तयारी सुरू केली आहे अधिकृत निवडणूक कार्यक्रम कधी जाहीर होतोय याकडे सर्व इच्छुक उमेदवारांचे लक्ष केंद्रित झाले आहे मात्र अखेर पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळविण्यासाठी कोण यशस्वी होतोय याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या