Ticker

6/Breaking/ticker-posts

विद्यार्थी व समाज घडविण्यात शिक्षकांचा मोठा वाटा - मा. आ.चंद्रशेखर घुले पाटील


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

     शेवगाव :  विद्यार्थ्यांचे उज्वल भविष्य घडविण्याबरोबरच समाजाच्या जडणघडणीमध्येही शिक्षकांचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे शिक्षकांचा सन्मान होणे ही काळाची गरज आहे,असे प्रतिपादन माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांनी केले. शेवगाव तालुक्यातील राज्य व जिल्हा पुरस्कार प्राप्त शिक्षक तसेच गुणवंत शिक्षकांचा गुणगौरव सोहळा शेवगाव येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी श्री.घुले अध्यक्षपदावरून बोलत होते.

पंचायत समितीचे माजी सभापती अरुण पाटील लांडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय कोळगे,ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक बबनराव भुसारी , शेवगाव तालुका दूध संघाचे चेअरमन अंबादास कळमकर, युवा नेते ताहेर पटेल,प्राथमिक शिक्षक बँकेचे व्हा. चेअरमन रमेश गोरे, शिक्षण विस्तार अधिकारी शैलेजा राऊळ, केंद्रप्रमुख ज्ञानेश्वर जाधव, सुभाष नन्नवरे, बाबुलाल पटेल आदी यावेळी उपस्थित होते.
पुढे बोलताना श्री. घुले म्हणाले, लोकनेते मारुतराव घुले पाटील यांनी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक कार्य पुढे नेताना शिक्षकांना नेहमीच आदराचे स्थान दिले. शिक्षकांच्या योगदानामुळे तालुक्याची वाटचाल सातत्याने विकासाच्या व प्रगतीच्या दिशेने सुरू आहे. माजी आमदार डॉ. नरेंद्र घुले पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ. राजश्री घुले पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीत काम करताना नेहमीच शाळा व शिक्षकांच्या प्रश्नांना प्राधान्य दिले, याचा मनस्वी आनंद वाटतो.

       यावेळी  राज्य शिक्षक पुरस्कार प्राप्त शुभांगी शेलार, उमेश घेवरीकर तसेच जिल्हा शिक्षक पुरस्कार प्राप्त गोरक्षनाथ बर्डे, नामदेव धायतडक, अंजली चव्हाण, केंद्रप्रमुख ज्ञानेश्वर जाधव यांचा व  ' मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा '  अभियानात जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक आलेल्या वाघोली तसेच तालुक्यात प्रथम आलेल्या खामगाव, द्वितीय खामपिंप्री व तृतीय वरूर बुद्रुक या जिल्हा परिषदेच्या शाळांचा तर, त्रिमूर्ती विद्यालय,रेसिडेंसिअल हायस्कूल , बाळासाहेब भारदे हायस्कूल व शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. रमेश गोरे यांनी प्रास्ताविक केले तर, राजू घुगरे यांनी सुत्रसंचालन केले.विलास लवांडे यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या