Ticker

6/Breaking/ticker-posts

शेवगावला दादाजी वैशंपायन ध्यान मंदिरात'अमलेश्वर' शिवपिंडीची प्रतिष्ठापना

शिवभक्त प.पू.प्रमिलादेवी वैशंपायन यांच्या कठोर उपासनेचे फलित









लोकनेता न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

    शेवगाव : नि: स्सीम शिवभक्त प्रमिलादेवी वैशंपायन यांनी तब्बल ४० वर्षे शिवाची कठोर उपासना करून संस्कारित केलेल्या ' अमलेश्वर ' शिवपिंडीची प्रतिष्ठापना शेवगावच्या श्रीदत्त देवस्थान संचलित योगतज्ञ प.पू.दादाजी वैशंपायन ध्यान मंदिरात विधिवत पूजाविधीने करण्यात आली.

 

नाशिकचे प.पू.श्री.गजानन कस्तुरे गुरुजी यांच्या अधिपत्याखाली तसेच ज्येष्ठ साधक दांपत्य शरद वैशंपायन व सौ.ललिता वैशंपायन यांच्या हस्ते मुख्य शिवपिंड विधी संपन्न झाला.पूजा विधीसाठी ३० स्त्री-पुरुष भाविकांनी सहभाग नोंदवला. 

 


      या निमित्ताने गणपती, भूमी, दीप, शंख, दिग आदींचे पूजन करण्यात आले.गणपती अभिषेक, शिवाचे अंगभूत देवतांचे आवाहन व पूजन तसेच शिव आराधना अंतर्भूत रुद्राभिषेक, बेलपत्र अर्पण, नैवेद्य व महाआरती झाली.दत्त देवस्थानचे अध्यक्ष अर्जुन फडके, सचिव फुलचंद रोकडे, ज्येष्ठ साधक अतुल पवार, हनुमान जोशी, पी.बी.शिंदे, जगन्नाथ गोसावी आदी यावेळी उपस्थित होते.महाप्रसादाने सोहळ्याची सांगता झाली.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या