लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
इस्लामाबाद दि. 25: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी
नुकतेच यूक्रेनला जाऊन आले. त्यासाठी त्यांनी
पाकिस्तानी हवाई क्षेत्राचा वापर केला. दरम्यान परत येताना मोदींचे
विमान पाऊणतास पाकिस्तानी हवाई क्षेत्रात होते, ही गुप्त माहिती मीडिया आउटलेट जिओ न्यूजने
नागरी उड्डाण मंत्रालयाच्या हवाल्याने उजेडात आणल्याने पाकिस्तानची पाचावर धारण
बसली असून या बातमीने पाकिस्तानात एकच खळबळ उडाली आहे.
पाकिस्तानातील नागरी उठाण विभागाशी निगडित सूत्रांच्या माहितीनुसार भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यूक्रेनवरुन नवी दिल्लीला परतताना पाकिस्तानी हवाई क्षेत्रातून त्यांनी प्रवास केला. पंतप्रधान मोदींचे विमान चित्तगाव मार्गे पाकिस्तानी आले आणि इस्लामाबाद वरून ते भारतात गेले, असे सांगण्यात येत आहे दरम्यान पंतप्रधान मोदी यांच्या विमानाने सकाळी दहा वाजून पंधरा मिनिटांनी पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केला होता. जवळपास 46 मिनिटे पाकिस्तानी हद्दीत हे विमान होते .11.01 वा. ते पाकिस्तानी हवाई क्षेत्राच्या बाहेर गेले.भारताच्या अमृतसर हवाई क्षेत्रात प्रवेश करण्यापूर्वी ते इस्लामाबाद आणि लाहोरच्या हवाई हद्दीतून प्रवास करत होते. सुमारे पाऊणतास पाकिस्तान हद्दीत ते कोठे होते, नेमके काय करत होते, अशा शंकानि पाकिस्तानमध्ये खळबळ उडवून दिली आहे.
यावर
तेथील प्रमुख वृत्तपत्र Don ने म्हंटले आहे की, भारतीय पंतप्रधानांनी
पाकिस्तानच्या हद्दीतून जात असताना सदिच्छा संदेश देण्याची परंपरा पाळली नाही.
त्यामुळे दोन्ही देशांमधील तनावाच्या चर्चेला उधाण आले
आहे सदिच्छा संदेश पाठवणे एक परंपरा आहे त्याची शक्ती
नाही परंतु पंतप्रधान मोदींनी यामुळे नवीन पायंडा पाडला की काय अशी शंका व्यक्त
केली आहे. या ताज्या घटनेने पाकिस्तानी मीडिया आणि
देशभरात एकच खळबळ उडाली आहे.
0 टिप्पण्या