लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
शेवगाव : शेवगाव- पाथर्डी विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमीत्त आठवडाभर शेवगाव तालुक्यात खेळ पैठणीचा, युवा संवाद मेळावा, भव्य कुस्ती स्पर्धा, विदयार्थ्यांना शालेय साहीत्य वाटप तसेच कीर्तन महोत्सव आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री.घुले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शेवगाव - पाथर्डी तालुका परिवर्तन विकास आघाडीच्या वतीने महिलांसाठी न्यु होम मिनीस्टर, खैळ पैठणीचा हा कार्यक्रम मंगळवार दि.१३ रोजी सकाळी १० वाजता बोधेगाव येथील भगवानबाबा मंगल कार्यालयात तर, बुधवार दि.१४ रोजी सकाळी १० वाजता शेवगाव येथील लक्ष्मी नारायण मंगल कार्यालयात सौ.नीलिमा नरेंद्र घुले पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा राजश्री घुले पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
शुक्रवार दि.१६ रोजी सकाळी १० वाजता मा.आ.डॉ.नरेंद्र घुले पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख वक्ते विठ्ठल कांगने, स्वराज रक्षक संभाजी मालिकेतील अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत युवा संवाद मेळाव्याचे आयोजन शहरातील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात करण्यात आले आहे.मंगळवार दि.१३ रोजी दहिगांव- ने येथे सकाळी ९ ते ११ या वेळेत सोपान महाराज कनेरकर यांचे हरीकीर्तन होणार आहे.
बुधवार दि.१४ रोजी शेवगाव शहरातील १८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विदयार्थ्यांना मा. आ.चंद्रशेखर घुले यांच्या हस्ते शालेय साहीत्याचे वाटप करण्यात येणार आहे तसेच शुक्रवार दि.१६ रोजी सायंकाळी ४ ते ७ या वेळेत शेवगाव केसरी भव्य कुस्ती स्पर्धेचे पैठण रस्त्यावरील क्रीडा संकुलामध्ये आयोजन करण्यात आले असून यामध्ये साडेतीन लाख,अडीच लाख व दीड लाख रुपयांसह चांदींच्या गदेसह विविध बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. या कार्यक्रमासाठी तालु मीक्यातील महिला, यवुक, युवती, पैलवान व ग्रामस्थांनी उपस्थित रहावे, असे आवाहन शेवगाव - पाथर्डी तालुका परिवर्तन विकास आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.
0 टिप्पण्या