Ticker

6/Breaking/ticker-posts

प्रा.आनंद पाटेकर यांचे सेट परिक्षेत यश




लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

शेवगाव : पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठाने एप्रिल २०२४ मध्ये सहाय्यक प्राध्यापक पदासाठी घेतलेल्या सेट पात्रता परीक्षेत ढोरजळगाव, (ता. शेवगाव) येथील प्रा.आनंद सुरेश पाटेकर यांनी घवघवीत यश प्राप्त केले आहे.

      प्रा.पाटेकर हे अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाच्या श्री मुलिकादेवी महाविद्यालयात इंग्रजी विषयाचे सहायक प्राध्यापक असून यापुर्वी ते ' पेट ' परिक्षेत पात्र झाले असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे संलग्नित, न्यु आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, अहमदनगर येथे पीएचडी करत आहेत.त्यांना  प्राचार्य डॉ.बाळासाहेब सागडे, प्राचार्य डॉ.भास्कर घोडके, प्राचार्य डॉ. सहदेव आहेर, प्राचार्य डॉ.लक्ष्मण मतकर, प्रा.डाॅ. जयश्री आहेर यांचे मार्गदर्शन लाभले.प्रा.पाटेकर हे येवला, (जि.नाशिक)पंचायत समतीचे गटविकास अधिकारी सुरेश पाटेकर यांचे चिरंजीव आहेत.

        प्रा.पाटेकर यांच्या यशाबद्दल जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र दरे, उपाध्यक्ष डॉ. विवेक भापकर, सचिव ॲड. विश्वासराव आठरे पाटील, सहसचिव जयंत वाघ, खजिनदार दीपलक्ष्मी म्हसे, ॲड. वसंतराव कापरे , बापुसाहेब भोसले आदींनी अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या