Ticker

6/Breaking/ticker-posts

विष्णू घोडेचोर यांना पीएसआयपदी बढती

लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

   
शेवगाव : येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात नियुक्तीस असलेले सहाय्यक फौजदार विष्णू घोडेचोर यांना ग्रेड पीएसआय पदी पदोन्नती मिळाली आहे.

देवसडे, (ता.नेवासा) येथील रहिवासी असलेले श्री.घोडेचोर सन १९९१ मध्ये अहमदनगर जिल्हा पोलीस दलात कॉन्स्टेबल म्हणून भरती झाले.३४ वर्षाच्या सेवाकाळात त्यांनी शेवगाव, पाथर्डी, लोणी, राहुरी आदी पोलीस स्टेशनमध्ये तसेच नगरच्या एलसीबीमध्ये उत्कृष्ट सेवा बजावली.कोपर्डी, (ता.कर्जत), जवखेडे, (ता.पाथर्डी) व जामखेड मधील गाजलेल्या हत्याकांडातील गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात त्यांचा मोठा सहभाग राहिला.त्यांच्या पदोन्नतीबद्दल उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

शेवगाव पोलीस स्टेशनचे पीआय समाधान नागरे यावेळी उपस्थित होते.पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी त्यांचे अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या