Ticker

6/Breaking/ticker-posts

शेवगावला दि.१३,१४ व १५ ऑगस्टला भव्य खरेदी महोत्सव


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

      शेवगाव : नागपंचमी, स्वातंत्र्य दिन व रक्षाबंधनाचे औचित्य साधून येथील श्री जगदंबा महिला मंडळाच्या वतीने दि. १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान खास फन, फूड, शॉपिंग ' खरेदी महोत्सवा ' चे आयोजन करण्यात आले आहे.

या संधीचा शेवगाव व  परिसरातील महिला, नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थापक अध्यक्ष सौ.सुजाता सागर फडके यांनी केले आहे. सलग तीन दिवस चालणारा हा ' खरेदी महोत्सव ' शेवगाव पंचायत समिती  लगतच्या श्रीनाथ मंगल कार्यालयात सकाळी नऊ ते रात्री नऊ पर्यंत सुरू राहणार आहे.

या महोत्सवात खाद्यपदार्थ, कपडे, ज्वेलरी, गृहपयोगी वस्तू, कॉस्मेटिक, मसाले आदींची खरेदी करता येणार आहे.खरेदी केलेल्या वस्तूवर भाग्यवान लकी ड्रॉ कुपन दिले जाणार असून, त्याच दिवशी सायंकाळी ड्रॉ काढण्यात येणार असून विजेत्यांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार असल्याचे सौ.फडके यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या