Ticker

6/Breaking/ticker-posts

३६०० कि.मी.अंतर कापण्यासाठी ११२ दिवस पायपीट.., अद्भुत..अगम्य..!






    

लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)


 शेवगाव : अष्टांग योगतज्ञ प.पू.दादाजी वैशंपायन यांच्या कृपाशीर्वादाने येथील श्रीदत्त देवस्थानचे जेष्ठ साधक पी.बी शिंदे यांनी ३६००कि.मी.अंतराची नर्मदा परिक्रमा ११२ दिवसात पायी पूर्ण केली.  या वयातील अद्भुत . अगम्य ..अशा अचाट .. अशा  कामगिरीचे कौतुक होत आहे.

तसेच तिरुपती बालाजी येथील कल्याण कट्ट्यावर केश अर्पण करून गाणगापूर यात्रा पूर्ण केल्याच्या प्रित्यर्थ दत्त भक्तांच्या वतीने देवस्थानचे मुख्य सेवेकरी संजय कुलकर्णी गुरुजी यांच्या हस्ते त्यांचा व्यंकटेश श्री बालाजी व प.पू.दादाजी वैशंपायन यांची प्रतिमा,शाल,सोहळे भेट देऊन सन्मान करण्यात आला.

     यावेळी योगेश तायडे,सुभाष गोलांडे, जगन्नाथ गोसावी, प्रा.डॉ.काकासाहेब लांडे, प्रदीप हारके, सारंगधर म्हस्के,बंडू भोर, योगेश जोशी,बिंटू गोलांडे,रघुनाथ जोशी,अशोक मुरदारे,अरुण वावरे,जयेश कुलकर्णी आदी दत्तभक्त उपस्थित होते.श्री.शिंदे यांचे दत्त देवस्थानचे अध्यक्ष अर्जुन फडके,सचिव फुलचंद रोकडे तसेच ज्येष्ठ साधक शरद वैशंपायन (कल्याण),अतुल पवार (सोलापूर),गिरीश साठे,अनुदीप दिघे,शाम बिच्छू,भूपेनजी पांचाळ,राजेश मेसवानी (मुंबई),रवींद्र पुसाळकर (मुलुंड),पराग इनामदार (पुणे),संदीप पवार (नाशिक),प्रशांत दिघे (ठाणे) आदींनी अभिनंदन केले  

     

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या