Ticker

6/Breaking/ticker-posts

भगवान बाबांनी समाजाला शिक्षणाचा गुरुमंत्र दिला : सौ. प्रभावती ढाकणे



लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)



बोधेगाव (विक्रम केदार):  त्याकाळी
 अठरा विश्वे दारिद्र्यात खितपत पडलेल्या, अडाणी आणि  आडमुठ्या समाजाला "शेत विका, पण पोर शिकवा" असा गुरुमंत्र संत  भगवान  बाबांनी आपल्या कीर्तन, प्रवचनातून दिला,  त्यामुळेच हा दुर्गम भाग आणि समाजही आज विकासाच्या मुख्य प्रवाहात येऊ शकला,  अशा शब्दांत मा. जि. प. सदस्या प्रभावती ढाकणे  यांनी बाबांच्या कार्याला अभिवादन केले.

संघर्षयोद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखाना येथे राष्ट्रसंत,  ऐश्वर्या संपन्न भगवानबाबा यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदच्या मा. सदस्या प्रभावती प्रतापराव ढाकणे यांनी भगवान बाबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थित समुदायासमोर त्या बोलत होत्या.

 यावेळी पुढे बोलताना सौ. ढाकणे म्हणाल्या की, बाबानी अज्ञान व अंधश्रद्धेपासून समाजाला परावृत्त करत शिक्षण हे कसे श्रेष्ठ आहे,  याचे महत्त्व तमाम समाजाला पटवून दिले.  त्यामुळेच आज या  पाथर्डी- शेवगाव तालुक्यातील शेतकरी कुटुंबातील सर्व सामान्य मुले राज्य सरकार,  केंद्र सरकार, शासकीय, निमशासकीय अशा सर्वच विविध खात्यामध्ये अधिकारी म्हणून कार्यभार सांभाळत आहेत.  ही संतश्रेष्ठ भगवान बाबांनी समाजाला दिलेली मोठी देणगी आहे.  समाज घडवण्याचं काम संतांनी केलं असून प्रत्येकाने जीवनामध्ये संतांचे विचार, शिकवण आचरण आणल्यास जीवनाचे सोने होते. त्याचा अंगीकार करावा,  असे आवाहन केले.


यावेळी ज्येष्ठ संचालक त्रिंबक चेमटे,  प्रभारी कार्यकारी संचालक रमेश गरजे, मुख्य शेतकी अधिकारी अभिमन विखे, प्रशासकीय अधिकारी पोपटराव केदार,चीप अकाउंटंट तीर्थराज घुंगरड, अकाउंटंट जनार्धन मनसुके, पांडुरंग पायघन, अकाउंटंट विक्रम केदार, रावसाहेब दहिफळे, रामनाथ बटुळे, बाबासाहेब आंधळे राजेंद्र ढाकणे, राजेंद्र कातकडे, अंबादास दहिफळे,सिव्हिल इंजिनिअर संजय चेमटे, विकास भिसे आदी मान्यवर उपस्थित होते.
सर्वानी बाबांच्या प्रतिमे समोर नतमस्तक होत अभिवादन केले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या