Ticker

6/Breaking/ticker-posts

शेतकऱ्यांनी पीक पेराची नोंद ई पीक ॲपद्वारे तत्काळ करावी : तहसीलदार प्रशांत सांगडे


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)


      शेवगाव : तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी आपापल्या शेतातील पीक पेराची नोंद तात्काळ ई  पीक पाहणी ॲपद्वारे करून घ्यावी,असे आवाहन तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी केले आहे.
       दि.१ ऑगस्ट २०२४ पासून महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार खरीप हंगाम २०२४ करिता शेतकरी स्तरावरून मोबाईलद्वारे ई पीक पाहणी नोंद सुरू करण्यात आलेली आहे.शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणी वर्जन ३.०.२ आपल्या मोबाईल हँडसेटमध्ये अद्ययावत करून घ्यावे व आपल्या शेतातील पिकांची नोंद लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावी.
        शासनाकडून पिक विमा योजना,नैसर्गिक आपत्तीचे सानुग्रह अनुदान जाहीर केल्यास ते वाटप करण्यासाठी सर्व शेतकरी बांधवांचे पीक पेराची नोंद ई पीक पाहणीद्वारे झालेली आवश्यक आहे,तसे न झाल्यास शासनाचे अनुदान बाधित शेतकऱ्यांना मिळणार नाही.त्यामुळे तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी आपापल्या शेतातील पीक पेराची नोंद तात्काळ ई पीक पाहणी या ॲप द्वारे करावी.या कामी काही अडचण असल्यास संबंधित गावचे तलाठी,कृषी सहाय्यक,मंडळ कृषी अधिकारी, मंडळ अधिकारी (महसूल) तालुका कृषी अधिकारी व तहसील कार्यालय येथे संपर्क साधावा,असे तहसीलदार श्री.सांगडे यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या