Ticker

6/Breaking/ticker-posts

जिल्हा कुस्ती स्पर्धेत बजरंग शिरसाटने पटकाविला पहिला क्रमांक..


 पैलवान शिरसाटची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड ; अभिनंदनाचा वर्षाव 
 







लोकनेता न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)


टाकळीमानुर : दि. 29 -पाथर्डी तालुक्यातील टाकळी मानूर येथील बजरंग गहिनीनाथ शिरसाट याने जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकाविला.  या यशामुळे  त्याची  राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. 

कर्जत येथे या स्पर्धा भरविण्यात आल्या होत्या. 14 वयोगटात 48 किलो वजन गटात प्रथम त्याने डाव- प्रतीडाव  खेळत  निकराची झुंज दिली. विरोधी पैलवानावर  डावाने मात्त करून विजयश्री खेचून आणली आणि पहिला क्रमांक पटकावला. त्यामुळेच त्याची  राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.


बजरंग  हा  माजी सभापती गहिनीनाथ शिरसाट  व.जिल्हा परिषद माजी सदस्य उज्वला शिरसाट  यांचा मुलगा आहे. तो  टाकळी मानुर येथील  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आश्रम शाळा शेकटेअंतर्गत शिक्षण घेत आहे.
दादा पाटील महाविद्यालय कर्जत येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत त्याने ही चमकदार कामगिरी केली. यापूर्वी पुणे, कोल्हापूर व्यायाम शाळेत त्याने प्रशिक्षण घेतले आहे. तालुकास्तरीय विविध स्पर्धेत त्याने आतापर्यंत उज्ज्वल यश संपादन केले आहे. यात त्याला संस्थेच्या अध्यक्षा अलकनंदा फुंदे,  मुख्याध्यापक अर्जुन सोनवणे, क्रीडा शिक्षक मनोज सोनवणे यांचे मार्गदर्शन लाभले.   

यशस्वी विद्यार्थ्यांचे खासदार निलेश लंके, अॅड प्रतापराव ढाकणे, माजी सभापती गहिनीनाथ शिरसाट,  जिल्हा परिषद माजी सदस्य उज्वला शिरसाट आदींनी अभिनंदन केले आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या