Ticker

6/Breaking/ticker-posts

जिल्हा कृषी अधिकाऱ्यांची शेवगावच्या राजेंद्र फलोद्यान येथे प्रक्षेत्र भेट




लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

शेवगाव : प्रगतशील शेतकरी श्रीनिवास सोमानी यांनी शेवगावच्या उजाड माळरानावर ३७ वर्षांपूर्वी राजेंद्र फलोद्यानचे रोपटे लावले तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती विकसित केली.येथे विविध फळझाडांची केलेली लागवड व शेतीतील नवनवीन प्रयोग शेतकऱ्यांसाठी पथदर्शी प्रकल्प ठरले आहेत,असे प्रतिपादन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी केले.



    

जिल्हा मासिक चर्चासत्र कार्यक्रमांतर्गत श्री.बोराळे यांचे प्रमुख उपस्थितीत जिल्ह्यातील उपविभागीय कृषी अधिकारी तसेच तालुका कृषी अधिकारी यांच्या उपस्थितीत पहिली प्रक्षेत्र भेट शुक्रवार दि.२३ रोजी शेवगाव जवळच्या राजेंद्र फलोद्यान येथे पार पडली,त्यावेळी ते बोलत होते.


      या प्रक्षेत्र भेटी दरम्यान कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी कांदा लागवड मार्किंग मशीन,कांदा निवडणी यंत्र तसेच नवीन पद्धतीच्या आंबा लागवड क्षेत्राची पाहणी करून कौतुक केले.व्यवस्थापक द्वारकानाथ कलंत्री यांनी फलोद्यानच्या विविध विभागाची माहिती अधिकाऱ्यांना दिली.अधिकाऱ्यांनी शेत शिवारात फेरफटका मारून मजुरांशीही संवाद साधला.तालुका कृषी अधिकारी अंकुश टकले यांनी चर्चासत्राचे नेटके नियोजन केले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या