शेवगाव : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर पोलीस दलातील १६ पीआय, ११ एपीआय तसेच १० पीएसआयच्या बदल्या करण्यात आल्या असून, त्यात शेवगावचे वादग्रस्त पीआय दिगंबर भदाणे यांचाही समावेश आहे.श्री.भदाणे यांची बदली संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलीस स्टेशनला झाली आहे.त्यांच्या जागी अहमदनगर नियंत्रण कक्षातून समाधान नागरे रुजू होत आहेत.
तसेच नाशिक येथून नव्याने बदलून आलेले पीएसआय दीपक पाठक यांना शेवगाव उपअधीक्षकांच्या कार्यालयात नियुक्ती देण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी सोमवारी रात्री बदल्यांचे आदेश निर्गमित केले.
पीआय श्री.भदाणे यांच्या कार्यकाळात शेवगाव शहर व तालुक्यात गुन्हेगारीत मोठी वाढ झाली तसेच अवैध धंदेही फोफावले.शेअर ट्रेडिंगच्या अवैध व्यवसायाने शेवगावची ओळख राज्याच्या नकाशावर अधोरेखित झाली.खासदार निलेश लंके यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयासमोर उपोषण करूनही शेवगाव व तालुक्यातील सर्व अवैध धंदे राजरोसपणे सुरू होते.हप्तेखोरी करणाऱ्या निवडक पोलिसांना पीआय भदाणे यांनी जवळ केल्याने अवैध धंद्याने सीमा ओलांडल्याचे बोलले जाते.हप्तेखोरी करणाऱ्या ' त्या ' पोलिस अंमलदारांच्या बदल्या होणे गरजेचे आहे, तसे न झाल्यास उद्रेकाची शक्यता नाकारता येत नाही.
0 टिप्पण्या