Ticker

6/Breaking/ticker-posts

पांडुरंग विद्यालयात लोकमान्य टिळक,अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन


     

लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

शेवगाव : श्री मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेच्या वरुर,(ता.शेवगाव)येथील पांडुरंग माध्यमिक विद्यालयात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.प्रारंभी मुख्याध्यापक बाबासाहेब धनवटे व ज्येष्ठ पत्रकार जगन्नाथ गोसावी यांच्या हस्ते टिळक व साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

      यावेळी सोफिया सय्यद,अश्विनी कसाळ या विद्यार्थिनींची भाषणे झाली.
श्री.धनवटे,श्री. गोसावी तसेच सांस्कृतिक विभाग प्रमुख जालिंदर शेळके यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी पोपट काळे,बाळासाहेब उकिरडे,प्रशांत लबडे,शरद भोसले,आदिनाथ खांबट,निलेश खंडागळे,रमेश वावरे,अनंत पाखरे आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्वागत व प्रास्ताविक विकास काळे यांनी केले.राजेंद्र जमधडे यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या