शेवगाव : शासनाच्या संजय गांधी निराधार,दिव्यांग तसेच श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती योजनेच्या शेवगाव तालुक्यातील २३ हजार ३९ लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर अनुदानाचे माहे एप्रिल व मे २०२४ या दोन महिन्याचे ६ कोटी ७५ लाख ३८ हजार ६०० रुपये वर्ग करण्यात आल्याची माहिती तहसीलदार प्रशांत सांगडे व संजय गांधी निराधार व स्वावलंबन योजनेचे नायब तहसीलदार निलेश वाघमारे यांनी दिली.
शेवगाव तालुक्यात या तिन्ही योजनेचे एकूण २३ हजार ३९ लाभार्थी असून,त्यात संजय गांधी निराधार योजनेचे ३९३४ दिव्यांग योजनेचे २२३५ तर,श्रावण बाळ सेवा निवृत्ती योजनेचे १४ हजार ७७० लाभार्थी आहेत.त्यांच्या बँक खात्यावर एप्रिल व मे या दोन महिन्याचे एकूण अनुदानाची रक्कम ६ कोटी ७५ लाख ३८ हजार ६०० रुपये वर्ग करण्यात आले आहेत.
दि.४ मार्च २०२४ रोजी पार पडलेल्या समितीच्या बैठकीत नव्याने मंजूर झालेल्या १३९६ लाभार्थ्यांना अनुदानाची रक्कम नजीकच्या काळात अदा केली जाणार असून त्या संदर्भातील प्रक्रिया सुरू असल्याचे श्री.सांगडे,श्री.वाघमारे व अव्वल कारकून शशिकांत देऊळगावकर यांनी सांगितले तसेच नव्याने दाखल झालेल्या प्रस्तावांना या महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या बैठकीत छाननी करून मंजुरी देणार असल्याचे ते म्हणाले.
0 टिप्पण्या