Ticker

6/Breaking/ticker-posts

नवीन साहित्यिक निर्माण होणे गरजेचे - आमदार संग्राम जगताप

लोकनेता  न्यूज 

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

नगर : साहित्य क्षेत्राला बळकटी देण्याचे काम वाचनातून होत असते, माणसे, जग समजण्यासाठी वाचनाशिवाय दुसरा पर्याय उपलब्ध नाही, वाचनामुळेच मी समाजामध्ये चांगले काम उभे करू शकलो आहे, मी अजून पर्यंत लिखाण केले नाही, मात्र तुमच्या सर्वांच्या मार्गदर्शनातून नक्कीच लिखाण करेल, शब्दगंध साहित्य परिषद हे उत्कृष्ट व्यासपीठ असून चांगले टीमवर्क आहे, या माध्यमातून साहित्यिकांना प्रोत्साहन मिळण्याचे काम होत असते, नवीन साहित्यिक निर्माण होणे गरजेचे आहे, आता आधुनिक युग आले आहे, आपल्यासमोर मोठ-मोठे आव्हाने उभे आहेत ही पार करायची असेल तर साहित्यिकांच्या विचाराची खरी गरज आहे, साहित्यिकांनी लिखाण केल्यानंतरच ते आपल्यासारख्यांना वाचता येते, साहित्यातूनच विविध विषयावर चित्रपटाची निर्मिती होत असते, शब्दगंध साहित्य परिषदेच्या माध्यमातून साहित्यिक घडले जातील आणि लिखाणाच्या माध्यमातून समाजाला ऊर्जा व प्रेरणा मिळेल असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले   


   शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने पंधराव्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनाच्या स्मरणिकेचे प्रकाशन प्रसंगी अध्यक्षपदावरून ते बोलत होते.यावेळी विचारपिठावर भाषा सल्लागार समितीचे सदस्य जयंत येलुलकर, प्राचार्य शिवाजीराव देवढे, प्रा.मधुसूदन मुळे, प्राचार्य डॉ. माहेश्वरी गावित, डॉ.जी.पी ढाकणे, चंद्रकांत भोसले, बापूसाहेब भोसले, ज्ञानदेव पांडुळे, शशिकांत नजान, नाट्य परिषदेचे प्रसाद बेडेकर,अमोल खोसे, शब्दगंध चे अध्यक्ष राजेंद्र उदागे, संस्थापक सुनील गोसावी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
       
प्राचार्य डॉ.माहेश्वरी गावित यावेळी बोलताना म्हणाल्या की, साहित्यिक चळवळ जिवंत ठेवण्याचे काम शब्दगंध ने केलेले असून लिहितात त्यांना हे बळ देत आहेत. चळवळी या अचानक उदयास येत नसून त्यासाठी मोठा त्याग आणि परिश्रम करण्याची तयारी असावी लागते.

डॉ. संजय कळमकर बोलताना म्हणाले की, साहित्यिकांनी इतरांचे वाचले तर आपले साहित्य सकस निर्माण होऊ शकते, त्यासाठी वाचायला हवे. कथा कवितांच्या कार्यशाळेतून नवनवे साहित्यिक निर्माण होऊ शकतात.

यावेळी प्रसाद बेडेकर,जयंत येलुलकर, शब्दगंध चे संस्थापक सुनील गोसावी,नेवासा शाखेचे अध्यक्ष प्रा.डॉ. किशोर धनवडे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी आमदार संग्रामभैया जगताप यांच्या हस्ते सुनील गोसावी, भगवान राऊत व शर्मिला गोसावी  यांनी संपादित केलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.

शब्दगंध च्या वतीने अभिवाचन स्पर्धेत सहभागी होऊन चाळीसगाव येथे सादरीकरण केल्याबद्दल सुफी सय्यद, राज्य नाट्य स्पर्धेत पहाट पक्षी नाटकाचे दिग्दर्शक संजय लोळगे व अभिनेत्री स्वानंदी भरताल, अनन्यता काव्यसंग्रहाच्या सरोज आल्हाट, कविवर्य चंद्रकांत पालवे, प्रा. मेधाताई काळे,शाहीर अरुण आहेर, सुरेखा घोलप यांच्यासह साहित्य संमेलन यशस्वी करणाऱ्या सर्व टीमचा सत्कार करण्यात आला. 

   कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शर्मिला गोसावी यांनी केले तर प्रास्ताविक प्रा.डॉ.अशोक कानडे यांनी केले. शेवटी संयोजन समितीचे अध्यक्ष ज्ञानदेव पांडुळे यांनी आभार मानले.यावेळी ग्राहक मंचचे अध्यक्ष गजेंद्र क्षीरसागर, कॉ. नाना कदम, शब्बीर शेख, संजय भिंगारदिवे, बैचे सर,शरद गडकर,सुधीर फडके, शशिकांत गायकवाड, संतोष कानडे,शशिकांत घोडके, सरला सातपुते, प्राचार्य अशोक दौंड, अरविंद बटुळे, सत्यप्रेम गिरी, बाबासाहेब शिंदे,डॉ. रमेश वाघमारे, शिवाजी साबळे, पॉल भिंगारदिवे, कोपरगाव शाखेच्या मधुमिता निळेकर,अनिल साळवे, गणेश भगत, प्रसाद बनसोडे,जालिंदर बोरुडे, लहू दळवी, गौरव भुकन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी सुभाष सोनवणे यांनी सूत्रसंचालन केलेल्या काव्य संमेलनात अरविंद ब्राह्मणे, अरुण आहेर,अनिल गायकवाड, मारुती सावंत,शाहीर वसंत डंबाळे, शामा  मंडलिक, सुदर्शन धस, प्रबोधिनी पठाडे ,पांडुरंग रोडगे, दिगंबर गोंधळी, सुदर्शन धस  यांनी  कवितांचे वाचन केले.

    कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुभाष सोनवणे, शाहीर भारत गाडेकर, बबनराव गिरी,सुनील धस, प्रा.डॉ.तुकाराम गोंदकर, राजेंद्र फंड,राजेंद्र चोभे,स्वाती ठूबे, राजेंद्र पवार, डॉ.अनिल पानखडे, डॉ.किशोर धनवटे, जयश्री झरेकर, बाळासाहेब शेंदूरकर, ऋषिकेश राऊत, हर्षली गिरी,आरती गिरी, शर्मिला रणधीर, कल्याणी  सावंत यांनी विशेष परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या