लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
मुंबई/ अ 'नगर :-
काल पार पडलेल्या विधानपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दोनही उमेदवार विजयी झाले आहेत. त्यापैकी एक नाव आहे. शिवाजीराव गर्जे यांचे. त्यामुळे त्यांच्या रूपाने नगर जिल्ह्य़ाला आणखी एका आमदारकीची लॉटरी लागली आहे.
आमदार शिवाजीराव गर्जे यांनी राष्ट्रवादीच्या स्थापने पासून (१९९९) जिल्हाधिकारी पदाची नोकरी सोडून शरद पवार यांची साथ देत राजकारणात प्रवेश केला. तेव्हापासून ते पवारांसोबत होते. मात्र नुकत्याच राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीत ते अजितदादां बरोबर आले. दादांशि त्यांची प्रारंभी पासूनच गट्टी होती. परिणामी ते दादांशिवाय राहू शकले नाही.
असो. दादांनीही गर्जेना विधानपरिषदेवर पाठविण्याचा निर्णय घेऊन त्यांना निवडून आणून आपल्या पक्षात निष्ठावंत मंडळींना न्याय दिला जातो आहे, असा एक प्रकारे संदेशच पक्षातील आणि बाहेरच्यांना देखील दिल्याचे मानले जाते.
पक्ष फुटीनंतर बॅक फुटवर असलेले जितेंद्र आव्हाड हे अचानक फ्रंट फुटवर आले. राज्यभर झालेल्या मेळाव्यात त्यांनी शरदचंद्र पवार साहेबांचा किल्ला लढविला. किंबहुना राज्यभर या मेळाव्यातून कार्यकर्त्यांना निष्ठेचे उपदेश दिले. तसेच साहेबांच्या पक्षाचा वंजारी आणि ओबीसी चेहरा म्हणुन पुढे आले.
अजितदादांकडे मंत्री धनंजय मुंडे यांच्या रूपाने वंजारी व ओबीसी चेहरा आहेच. तथापि मुंडे हे आघाडीचे फायरब्रँड नेते आहेत. मोठ्या जबाबदार्या त्यांच्याकडे दिल्या जातात. त्यामुळे दुसर्या फळीत जितेंद्र आव्हाड यांची जागा भरून काढण्यासाठी गर्जेना फ्रंटवर आणल्याचि चर्चा आहे. शिवाय गर्जेना मोठा प्रशासकीय अनुभव आहे, त्याचा पक्षाला निश्चित फायदा होईल,असे धोरण आहे, हे लक्षात घेऊन गर्जेना संधी मिळाली. त्यामुळे पाथर्डीला स्व. बबनराव ढाकणे यांच्या नंतर दुसर्यांदा विधानपरिषदेवर संधी मिळाली आहे. शिवाय जिल्ह्य़ाला आणखी एक 14 वे आमदार त्यांच्या रूपाने मिळाला आहे. शिवाय त्यांचे आमदारकीचे स्वप्न साकारले आहे.
आमदार शिवाजीराव हे पाथर्डी तालुक्यातील दुले चांदगाव चे असून त्यांनी कलेक्टरची नोकरी सोडली, एवढी वर्षे पवार साहेबांबरोबर राहूनही आमदारकीबाबत निराशा झाली, पण आता अजितदादांनी त्यांना विधानपरिषदेत संधी देऊन आपला शब्द पूर्ण केलाय. पवारांकडून निराशा..आता मात्र थेट अजितदादांकडून विधानपरिषद बक्षीस मुळे पाथर्डी-शेवगावमध्ये त्यांच्या समर्थकांत अधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
0 टिप्पण्या