लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
शेवगाव : गोरगरिबांच्या वेदना जाणून त्यांना मदतीचा आधार देण्याचे सामाजिक कार्य रोटरीचे आहे.शेवगाव रोटरी क्लबने गेल्या नऊ वर्षात विविध उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपली आहे,असे गौरवोद्गार इनफंट इंडिया (आनंदवन) स्वयंसेवी संस्थेचे प्रमुख तथा सामाजिक कार्यकर्ते दत्ता बारगजे यांनी केले.
येथील ममता लॉन्स येथे पार पडलेल्या रोटरी क्लब ऑफ शेवगाव सिटीच्या नुतन पदाधिका-यांचा पदग्रहण समारंभ रोटरीचे सहप्रांतपाल पुरूषोत्तम जाधव व बारगजे यांच्या हस्ते पार पडला.यावेळी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.माजी आमदार चंद्रशेखर घुले यावेळी उपस्थित होते.
रोटरीत दरवर्षी नवीन पदाधिका-यांना संधी दिली जाते. त्यानुसार मावळते अध्यक्ष रो. मनेष बाहेती यांनी पदाची सुत्रे नुतन अध्यक्ष रो प्रा.डॉ.काकासाहेब लांडे यांच्याकडे,माजी सचिव रो प्रदिप बोरूडे यांनी नुतन सचिव रो मोहम्मद वसिम तर,माजी खजिनदार रो सुधाकर जावळे यांनी नुतन खजिनदार रो संतोष ढाकणे यांच्याकडे पदाची सुत्रे यावेळी प्रदान केली.
श्री.बारगजे म्हणाले,दिवंगत समाजसेवक बाबा आमटे यांच्या कार्यापासून आपण प्रेरणा घेऊन एचआयव्ही बाधित महिला व मुलांच्या संगोपनासाठी बीड जिल्ह्यात स्वयंप्रेरणेने कार्य सुरू केले. माझ्या पत्नीनेही या कार्यात साथ दिली.शासनाचे कुठलेही पाठबळ नसताना समाजातील दानशूर व्यक्तींच्या सहकार्यातून गेल्या २० वर्षांपासून आम्ही कार्य करीत असून त्यातून अनेक ३९ महिलांचे विवाह लावून संसार पुन्हा उभे केले.अनेक मुले - मुलींनी चांगले शिक्षण घेऊन नोक-या मिळविल्या,असे सांगून या कार्यासाठी मदतीची आणखी गरज असल्याचे ते म्हणाले.
शेवगाव रोटरीच्यावतीने सुर्यकांता नदीचे ढोरा नदीपर्यंत रुंदीकरण व खोलीकरणाचे महत्वकांक्षी काम राज्याच्या जलसंधारण सचिव मृदुला भारदे यांच्या सहकार्यातून सुरू असून त्यांच्या सहकार्याबद्दल त्यांचे वडिल रमेश भारदे यांचा सपत्निक तसेच या उपक्रमासाठी मदतीचा हात पुढे करणारे सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब गवळी,बाजार समितीचे माजी सभापती संजय फडके यांचा यावेळी सत्कार करण्यात मआला.नेत्र रूग्णालय या उपक्रमात अल्प दरात सेवा देण्याच्या कार्याबद्दल डॉ.मयुर लांडे यांचाही गौरव करण्यात आला.रोटरी क्लबच्या विविध उपक्रमांची अमंलबजावणी तसेच काही नवीन उपक्रम वर्षभरात राबवण्याचा संकल्प असल्याचे नुतन अध्यक्ष लांडे यांनी व्यक्त केला.रोटरीचे सहप्रांतपाल जाधव यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी डॉ.संजय लड्डा,डॉ.गणेश चेके,मुधोळकर सर,डॉ.मयूर लांडे,डॉ.आशिष लाहोटी,डॉ.दिनेश राठी,युसूफ पठाण,मनेष बाहेती,डॉ.मनिषा लड्डा,डॉ. प्रतिक्षा बेडके,अशोक लबडे, प्रा.किसनराव माने,दिलीप फलके,बाळासाहेब चौधरी आदी उपस्थित होते.प्रास्ताविक रो मनेष बाहेती यांनी केले.पाहुण्यांचा परिचय रो भागनाथ काटे यांनी करून दिला तर,सूत्रसंचालन रो डॉ.गजानन लोंढे यांनी केले. रो संतोष ढाकणे यांनी मानले
रोटरीचे कार्य कौतुकास्पद : चंद्रशेखर घुले
शेवगाव रोटरी क्लबने सामाजिक बांधिलकीने अनेक उपक्रम राबविले असून आपण या पुर्वीही रोटरीच्या उपक्रमांना मदतीचा हात दिला आहे.रोटरीचे कार्य कौतुकास्पद असून या पुढील काळातही आपण सर्वतोपरी सातत्याने मदत करू. अशी ग्वाही माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी या वेळी दिली.
0 टिप्पण्या