मुंबई: आज सकाळी विधान परिषदेसाठी चुरशीने झालेल्या निवडणुकीत भाजपाच्या ओबीसी नेत्या पंकजाताई मुंडे यांनी दणदणीत विजय मिळविला आहे. त्यामुळे समर्थकांनी एकच जल्लोष केला.
गेल्या 5 वर्षापासुन पंकजा यांना राजकीय विजनवासात राहावे लागले होते. प्रत्येक वेळी त्यांचे नाव चर्चेत असायचे परंतु अचानक बॅक फुट वर जायचे. दोन पराभवानंतर अखेर भाजपाने त्यांना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर केली.
कायम बिनविरोध होणार्या विधान परिषदेत यावेळी निवडणूक झाली.
या निवडणुकीचा निकाल जाहीर होऊ लागला असून पंकजा यांचेसह भाजपचे 3 उमेदवार विजयी झाल्याचे वृत्त नुकतेच हाती आल आहे ..
गेले 5 वर्षापासुन राजकीय विजनवासात असलेल्या भाजपाच्या ओबीसी नेत्या पंकजाताई मुंडे यांना या विजयाने राजकीय बळ मिळाले आहे. त्यामुळे मुंडे समर्थकांनी गुलालाची उधळण करीत एकच जल्लोष केला आहे.
0 टिप्पण्या