लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
शेवगाव : शेवगाव येथील गुरुदत्त सामाजिक संस्था संचलित वैशंपायन नगर मधील श्रीदत्त देवस्थान तसेच अष्टांग योगतज्ञ प.पू.दादाजी वैशंपायन ध्यान मंदिरात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली.या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.
साधक समूहाच्या वतीने प.पू.दादाजींच्या मूर्तीवर पुरुषसूक्त व सकृत रुद्रावर्तन अभिषेक तर,स्वामी समर्थांच्या पादुकावर रुद्रावर्तन अभिषेक तसेच सद्गुरु श्री दत्तात्रेयांच्या मूर्तीवर पुरुषसूक्त आवर्तन अभिषेक घालण्यात आला.तुकाराम चिक्षे गुरुजी यांनी पौरोहित्य केले.
यानिमित्ताने साधक समूहाच्या वतीने मंत्र पठण करण्यात आले.डॉ.सतीश दौंड व डॉ.प्रिया दौंड यांच्या हस्ते महाआरती झाली.त्यानंतर महाप्रसादाचे वाटप झाले.गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून दादाजी प्रसादालय परिसरात पाथर्डी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड व नंदकुमार शेळके यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
याप्रसंगी गुरुदत्त संस्थेचे अध्यक्ष अर्जुन फडके सचिव फुलचंद रोकडे,ज्येष्ठ साधक पी.बी.शिंदे, बाबुशेठ जोशी,ओमप्रकाश बाहेती,सुरेश घुले,प्रदीप हारके तसेच सेवाभावी कार्यकर्ते संजय कुलकर्णी,लक्ष्मण काळे,अभय पालवे,बंडू भोर,योगेश तायडे,अशोक मुरदारे आदी उपस्थित होते.
0 टिप्पण्या