Ticker

6/Breaking/ticker-posts

'धाकट्या पंढरी' ची बिकट वाट अखेर झाली सुकर..!


लोकनेता  न्यूज 

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)


    शेवगाव : सामाजिक व धार्मिक कार्यक्रमात अग्रेसर असणाऱ्या शेवगावच्या गुरुदत्त सामाजिक संस्थेचे सचिव,ज्येष्ठ सेवाभावी सामाजिक कार्यकर्ते तसेच गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर फुलचंद रोकडे यांनी शेवगाव -  वरुर या ५ कि.मी.अंतराच्या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम दर्जेदार केल्याने त्यांचा श्रीक्षेत्र वरुर येथील वारकरी सेवा संघातर्फे मुकुंद महाराज अंचवले यांच्या हस्ते श्रीविठ्ठल - रुक्मिणी प्रतिमा,शाल,श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.त्रिवेणी संगमावर भक्त पुंडलिक मंदिर परिसरात नगर प्रदक्षिणा मार्गावर आषाढी एकादशीला हा सत्कार सोहळा पार पडला.

     
  ' धाकटी पंढरी ' श्रीक्षेत्र वरुर येथे श्री विठ्ठलाचे साडेचारशे वर्षाचे पुरातन मंदिर असून तेथील वालुकामय मूर्ती स्वयंभू आहेत.या रस्त्याच्या डांबरीकरण कामासाठी आ.मोनिकाताई राजळे यांनी भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे.सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता के.बी.दंडगव्हाळ,उपविभागीय अभियंता प्रल्हाद पाठक,शाखा अभियंता रामेश्वर राठोड तसेच निवृत्त कर्मचारी सुरेश घुले यांचे मार्गदर्शन व देखरेखीखाली श्री.रोकडे यांनी या रस्त्याचे काम  मुदतीत व दर्जेदार केल्याने त्यांचा श्री.अंचवले यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

    श्री.रोकडे यांनी या रस्त्यावर मोक्याच्या ठिकाणी स्पीड बेकर,व्हाईट थरमप्लास्ट, डेलीनेटर,रेड कॅट आइजचे काम केल्याने रस्त्याचे  रुपडे खुलून गेले आहे. तसेच आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला रस्त्याच्या दुतर्फा ' पाऊले चालती पंढरीची वाट ' या शीर्षकाचे फलक लावून त्यावर संत शिरोमणी तुकोबारायांची अभंगवाणी चितारली आहे. त्यामुळे अनेकांनी श्री.रोकडे यांच्या सेवाभावी वृत्तीचे कौतुक व अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या