Ticker

6/Breaking/ticker-posts

‘ना डामडोल, ना बड्या बाता, हाच खरा बळीराजाचा नेता..!’ याच फलकाची जोरदार चर्चा..


लोकनेता  न्यूज 

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

पाथर्डी : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर प्रत्येक मतदारसंघात पक्षनिहाय भावी आमदार आतापासूनच तयारीला लागले आहेत. अस  काहीस वातावरण सध्या पहायला मिळत आहे. त्यात एखादा ईव्हेंट म्हणजे कार्यकर्त्यांसाठी मोठी पर्वणीच..!
निमित्त होते राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) राष्ट्रीय सरचिटणीस अॅड प्रतापराव ढाकणे यांच्या ( दि. 18 जुलै) वाढदिवसाचे...

 अॅड. प्रतापराव ढाकणे म्हणजे..एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व.. मात्र गेल्या 3 टर्मपासून आमदारकीसाठी ईच्छा बाळगून असलेले नेते..परंतु प्रत्येक वेळी त्यांना या ना त्या कारणाने वंचित राहावे लागले..तरीही हार न मानता,  तेवढ्याच तडफेने पुन्हा मैदानात उतरणारे कणखर नेतृत्व म्हणुन ओळखले जातात. आगामी विधानसभा निवणुकीत ढाकणे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रबळ दावेदार आहेत. या पक्षाकडून सध्या तरी त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.

दरम्यान त्यांचा विधानसभेच्या आधीच वाढदिवस आल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी  अप्रत्यक्षपणे प्रचाराची एक नामी संधी चालून आली. समर्थकांनीही ती यथार्थ ठरविली, असे म्हणावे लागेल. सर्वसामान्य जनता व कार्यकर्त्यांत उत्साही  वातावरण संपूर्ण मतदारसंघात पहायला मिळाले. 

विशेषत: गावा-गावात लावलेले "फ्लेक्स बोर्ड" लक्षवेधी ठरले.  ‘वेळ प्रताप ढाकणे परिवर्तनाची संघर्ष योध्याची', संकट काळात सर्वाना पाठबळ देणारे काका’ अशा आशयाचे फलक सध्या संपूर्ण मतदारसंघात झळकत आहेत. यामध्ये  " ‘ना डामडोल, ना बड्या बाता, हाच खरा बळीराजाचा नेता’, या एका फलकाने लक्ष वेधून घेतले. त्याचीच शेवगाव-पाथर्डीत जोरदार चर्चा सुरु आहे.

माजी केंद्रीय मंत्री स्व. बबनराव ढाकणे यांनी ऊसतोडणी कामगार, उपेक्षित, पीडित आणि गोर- गरिबांसाठीच आयुष्यभर संघर्ष केला. गावचे सरपंच ते केंद्रीय मंत्रिपदापर्यंत त्यांनी मजल मारली. प्रेक्षक गॅलरीतून मारलेली उडी, राजदंड पळविणे, थेट तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची घेतलेली अनपेक्षित भेट,  आदी घटना त्यांच्या  संघर्षमय वाटचालीचा
प्रवास थक्क करणारा आहे. राज्यातील सर्व संविधानिक पदे त्यांनी भूषविली.गरिबांचे कैवारी आणि संघर्षयोद्धा म्हणून संपूर्ण महाराष्ट्र त्यांना ओळखतो. किंबहुना संघर्ष हाच त्यांचा स्थायीभाव होता.. आणी प्रताप  काकांचाही अर्थात तोच..

वडीलांचा हाच वारसा प्रतापकाकानी समर्थपणे पुढे चालविला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार  गटाचे सरचिटणीस प्रतापराव ढाकणे यांच्या मित्रमंडळाने हे फलक लावत आगामी विधानसभेला मतदारांनी ढाकणे यांनाच साथ द्यावी, असे आवाहन केले आहे. ढाकणे यांच्या समर्थकांनी संपूर्ण मतदारसंघात लावलेल्या विविध  फलकांवर भावी आमदार प्रतापकाका.., वारसा संघर्षाचा, विचार जनहिताचा.., बांधिलकी सर्वसामान्यांशी.., चला संघर्षाला यशाची जोड देऊ या.., अशा पद्धतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हा "फ्लेक्स सेलिब्रेशन" सध्या  चर्चेचा विषय झाला आहे.

भाजप उमेदवार कुणीही असो " काटे की टक्कर"
यापुर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत अगदी थोड्या मतांनी काकांचा पराभव झाला, तरीही ते  कमालीचे सक्रिय आहेत. २०१९ लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार डॉ. सुजय विखे यांना शेवगाव-पाथर्डी मतदारसंघातून सुमारे ६१ हजार मतांचे मताधिक्य मिळाले होते.  नुकत्याच झालेल्या निवडणुकीत हे मताधिक्य घटून विखे यांना केवळ साडेसात हजारांचे मताधिक्य मिळाले. हे मताधिक्य घटविण्यात ढाकणे यांची चाणाक्ष व्यूहरचना व  मतदार संघातील  संपर्क अभियान कामी आले. त्यांची ही भूमिका मोलाची व  निर्णायक ठरल्याने नीलेश लंके यांना खासदारकीची लॉटरी लागण्यास महत्वपूर्ण ठरली. त्यामुळे  सध्या ढाकणे यांचा आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे. त्यांच्या विरोधात भाजपकडून विद्यमान आमदार मोनिका राजळे  किंवा इतर कुणीही रिंगणात असले तरी यावेळी 'काटे की टक्कर' पाहायला मिळेल, असे चित्र निर्माण झाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या