लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
शेवगाव : ' धाकटी पंढरी ' अशी ओळख असलेल्या श्रीक्षेत्र वरुर येथे आषाढी एकादशी निमित्त माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांनी सकाळी स्वयंभू श्रीविठ्ठल - रुक्मिणीचे दर्शन घेतले.
शेतकरी व जनतेला सुख समाधान व समृद्धी लाभावी,अशी प्रार्थना श्री घुले यांनी श्रीविठ्ठल - रुक्मिणीकडे केली.देवस्थानचे अध्यक्ष तथा प्रसिद्ध भागवताचार्य दिनकर महाराज अंचवले यांचे आशीर्वाद त्यांनी घेतले.आषाढी उत्सव समितीच्या वतीने सरपंच सचिन म्हस्के यांनी त्यांना श्रीविठ्ठल - रुक्मिणीची प्रतिमा देऊन सन्मान केला.
वरुर सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन मधुकर वावरे,माजी सरपंच गोपाळ खांबट,कौस्तुभ अंचवले,माणिक म्हस्के,आप्पासाहेब भुजबळ,श्रीकांत भुजबळ,अशोक म्हस्के,सुधीर म्हस्के,महेश मस्के,भाऊसाहेब खडके,सुरेश वावरे आदी यावेळी उपस्थित होते.
0 टिप्पण्या