लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
शेवगाव : इन्स्टिट्यूट ऑफ चार्टड अकाऊंटस् ऑफ इंडियाच्या वतीने मे २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या सीए फायनल परीक्षेत खरडगाव,(ता.शेवगाव) येथील ज्ञानेश्वर रावसाहेब बोडखे उत्तीर्ण झाले. त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
त्यांचे प्राथमिक,माध्यमिक शिक्षण खरडगाव येथे तर,उच्च माध्यमिक शिक्षण शेवगाव येथे झाले.त्यांनी पुणे (डेक्कन) येथील ए.एन गावडे अँड कंपनी या संस्थेत आर्टिकल शिप पूर्ण केली.सीए चा अभ्यासक्रम चालू असतानाच त्यांनी बीकॉम ची पदवी संपादन केली.
आपले आई वडील शेतकरी असून त्यांनी शिक्षणासाठी प्रोत्साहन दिल्याचे श्री.बोडखे यांनी सांगितले.त्यांच्या यशाबद्दल सरपंच भगवान डावरे,माऊली कृषी सेवा केंद्राचे संचालक कल्याण काकडे तसेच ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.
0 टिप्पण्या