Ticker

6/Breaking/ticker-posts

शेवगाव तालुक्यात कायदा व सुव्यवस्थेचे तीन तेरा


लोकनेता  न्यूज 

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)


        शेवगाव :  शेवगाव पोलीस स्टेशनचे पीआय दिगंबर भदाणे यांच्या अकार्यक्षमतेमुळे तालुक्यात अवैध धंदे,चोऱ्यामा-या वाढल्या आहेत. परिणामी,तालुक्याची कायदा सुव्यवस्था ढासळली आहे तसेच पोलीस स्टेशनमध्ये चिरीमिरी घेतल्याशिवाय कोणतीही काम होत नाही.पीआय मनमानी पद्धतीने कारभार करतात, वकिलांना अपमानास्पद वागणूक देतात.त्यांच्या मनमानी कार्यपद्धतीची सखोल चौकशी होऊन कडक कारवाई करण्यात यावी,अशी मागणी शेवगाव तालुका वकील संघाच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे.

        निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यात सर्वत्र अवैध धंदयाचा सुळसुळात झाला आहे.चो-यांच्या घटनांमध्ये मोठया प्रमाणात वाढ झाली आहे.यामुळे नागरिक भयभीत आहेत.गुन्हेगारांवर पोलीस प्रशासनाचा बिलकुल अंकुश,दरारा नाही.पोलीस स्टेशनला दलालांचा वेढा आहे.सर्वच अवैध धंद्यांना पोलीसांचे अभय असल्याने हे धंदे राजरोजपणे सुरु आहेत.पक्षकारांच्या कामानिमित्त वकिलांना पोलीस स्टेशनला जावे लागते,तेव्हा संबंधित अधिकारी वकिलांना उद्धट व अरेरावीची भाषा वापरून अपमानास्पद वागणूक देतात,असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. याबाबत सखोल चौकशी व्हावी व पीआय श्री.भदाणे यांचेवर कायदेशीर कडक कारवाई व्हावी,अशी मागणी वकील संघाने केली असून तसे न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

     निवेदनावर शेवगाव तालुका वकील संघाचे अध्यक्ष अँड.रामदास बुधवंत,सचिव अँड. संभाजी देशमुख,उपाध्यक्ष अँड.विजय भेरे,ज्येष्ठ विधीज्ञ अँड.अर्जुनराव जाधव,माजी अध्यक्ष अँड.कारभारी गलांडे,  अँड.मनोहर थोरात,अँड.शिवाजी भोसले,अँड.अमोल वेलदे,अँड.अभय कराड,अँड.जयप्रकाश देशमुख,अँड.ए.बी.शिंदे,अँड. किरण अंधारे,अँड.महेश आमले, अँड.रविंद्र सकट,अँड.नामदेव गरड आदी पदाधिका-यांच्या सहया आहेत.

     -----------------------------------------
गृह विभागाने दखल घेण्याची गरज
      पीआय च्या विरोधात वकील संघाने आंदोलन छेडण्याचा दिलेला इशारा ही गंभीर बाब असून गृह विभागाने याबाबत गांभीर्याने पाहिले पाहिजे.पीआय वकिलांना अपमानास्पद वागणूक देत असतील तर,सामान्य जनतेने दाद कोणाकडे मागायची ?असा प्रश्न या निमित्ताने पुढे आला आहे.
    ----‐--------------------------‐,--------------
     वकील संघाचे निवेदन प्राप्त झाले असून त्या अनुषंगाने पीआय दिगंबर भदाने यांचेकडे खुलासा मागविण्यात आला आहे. खुलासा प्राप्त होताच अहवाल वरिष्ठांना सादर करण्यात येईल. 
-सुनील पाटील
(उपविभागीय पोलीस अधिकारी,शेवगाव विभाग)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या