Ticker

6/Breaking/ticker-posts

हक्काचा लोकप्रतिनिधी विधानसभेत पाठवून एकदा संधी द्या, सोनं करू - मा.आ.चंद्रशेखर घुले पाटील



लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 शेवगाव : गेल्या दहा वर्षात शेवगाव - पाथर्डी विधानसभा मतदारसंघात विकासाचे कोणतीही भरीव काम झाले नाही,त्यामुळे मतदार संघ विकासापासून वंचित राहिला.हीच परिस्थिती कायम राहिली तर,पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही.आपले प्रश्न प्राधान्याने सोडवण्यासाठी आपल्या मातीतील व हक्काचा माणूस लोकप्रतिनिधी म्हणून विधानसभेत पाठवा,असे आवाहन माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांनी केले.

       परिवर्तन जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने वरुर,(ता.शेवगाव)येथे झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते.यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती डॉ.क्षितिज घुले,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे,बबनराव भुसारी,अंबादास कळमकर,पंडितराव भोसले आदी उपस्थित होते.

      श्री.घुले पुढे म्हणाले,प्रधानमंत्री पिक विमा योजनेपासून या परिसरातील शेतकरी वंचित आहेत.मात्र,नजीकच्या तालुक्यातील शेतकऱ्यांना पिक विम्याची रक्कम मिळाली आहे.जायकवाडी धरणाचे पाणी मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर,जालना,बीड,नांदेड या जिल्ह्यांना मिळते.मात्र,धरणाच्या उशाला असलेल्या शेवगाव तालुक्याला ते मिळत नाही,परिणामी,या परिसरातील शेतकरी उध्वस्त झाला आहे.याबाबत खंत व्यक्त करून ते म्हणाले,शेवगाव विधानसभा मतदारसंघात बेरोजगारीचा मोठा प्रश्न आहे.येथे कुशल कारागीरांची मोठी संख्या असताना त्यांना रोजगारासाठी संभाजी नगरच्या वाळूज तसेच नगरच्या एमआयडीसीत जावे लागते.

      आपल्याला विधानसभेत जाण्याची संधी मिळाली तर,शेवगाव तालुक्यात एमआयडीसी आणण्याचा शब्द मी तुम्हाला देतो.एकदा संधी द्या,संधीचे सोने करील.मात्र,त्यासाठी कार्यकर्त्यांनी आपसातील मतभेद विसरून संघटितपणे काम करावे,असे आवाहन श्री.घुले यांनी केले.

    याप्रसंगी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन मधुकर वावरे,व्हा.चेअरमन भानुदास सोनटक्के,माणिक म्हस्के,श्रीधर म्हस्के,गोपाळ खांबट,पुरुषोत्तम राठी,अशोक खांबट,कानिफ म्हस्के,सुभाष म्हस्के,सुधीर म्हस्के,आप्पा भुजबळ,नामदेव तुजारे,बन्सी तुजारे,कुंडलिक महाराज लव्हाट,अण्णा महाराज वावरे,गोरख वावरे,समशेर पठाण,कुंडलिक चव्हाण,बन्सी वावरे,राजू खडके,मारुती लव्हाट,खंडू चितळे,महेश म्हस्के, अविनाश म्हस्के,शेषराव म्हस्के,मुरलीधर म्हस्के,साहेबराव रेवडकर,इमाम पठाण आदी स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या