Ticker

6/Breaking/ticker-posts

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा शरद पवारांवर गंभीर आरोप..





लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

पुणे: विरोधक भ्रष्टाचारची बात करत आहेत. तुम्ही काय आरोप करता? या देशात कोणत्याही सरकारमध्ये भ्रष्टाचार वाढवण्याचं काम कुणी केलं असेल तर ते शरद पवार यांनी केलं आहे. मी डंके की चोटपे सांगतो, देशाच्या राजकारणात शरद पवार हे भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे सूत्रधार आहेत, असा गंभीर आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला.


तेआज पुण्यात भाजपच्या महाराष्ट्र अधिवेशनात कार्यकर्त्यांना मारगदर्शन करतांना बोलत होते. यावेळी उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार पंकजा मुंडे, आदींसह पक्षाचे बहुतांशी आमदार, पदाधिकारी, व राज्यभरातील कार्यकर्ते मोठया संख्येने सहभागी झाले होते.


 यावेळी अमित शहा यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर चौफेर हल्ला चढविला. ते म्हणाले, पवार प्रत्येक निवडणुकीत लोकांची दिशाभूल करुन गेम करतात, मात्र यावेळी शरद पवारजी माझा कार्यकर्ता हुशार झाला आहे. त्याला तुमच्या खोट्या प्रचाराची जाणीव झाली आहे. आता तुमचा खोटा प्रचार चालणार नाही. घरोघरी जावून या खोट्या प्रचाराचा पर्दाफाश करायचा आहे. हे खोटं बोलणार आणि भ्रम निर्माण करतील. तसे यावेळी होणारं नाही.


ते पुढे म्हणाले, "उद्धव ठाकरे हे औरंगजेब फॅन क्लबचे नेते आहेत. औरंगजेब फॅन क्लब भारताची सुरक्षा सुनिश्चित करू शकत नाही.  कसाबशी संबंधित असलेल्या लोकांसोबत एका ताटात जेवतात, ते पीएफआयला पाठिंबा देत असून औरंगाबादचे संभाजीनगर, असे नामकरण करण्याच्या विरोधात उभे आहेत. हा फॅन क्लब महाराष्ट्र आणि भारत सुरक्षित करू शकत नाही. केवळ भाजपच सर्वांची सुरक्षा सुनिश्चित करू शकतो" असं  शहा यांनी ठणकावले.


प्रत्येक कार्यकर्त्याने कमळसाठी समर्पित व्हावे. कमळाला जिंकण्यासाठी प्रयत्नांची पराकष्ठा करावी”, अशा सूचना अमित शाह यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिल्या.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या