लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
मुंबई: भाजपाने नुकतेच विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर केली असून गेले 5 वर्षापासुन राजकीय विजनवासात असलेल्या भाजपाच्या ओबीसी नेत्या पंकजाताई मुंडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
नुकत्याच हाती आलेल्या ताज्या बातमीनुसार भाजपाने पंकजा मुंडे, खोत, फुके यांच्यासह पाच जणांना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीरकरून, सोशल इंजिनिअरिंग साधले आहे.
विधानसभा सदस्याच्या कोट्यातून विधानपरिषदेचे सदस्य निवडून देण्यात येणार आहेत. विधानपरिषदेच्या अकरा जागा रिक्त असून, त्यातील पाच जागा भाजपला मिळणार आहेत. त्यासाठी भाजप केंद्रीय नेतृत्वाने पाच नाव निश्चित केले आहेत. ओबीसी नेत्या पंकजा मुंडे , पुण्याचे योगेश टिळेकर, डॉ. परिणय फुके, अमित गोरखे, सदाभाऊ खोत या पाच जणांना भाजपकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. उमेदवारी देताना भाजपने सोशल इंजिनिअरिंग साधले आहे.
या यादीत चार नावे हे ओबीसी समाजातील आहे. तर एक उमेदवार हे दलिस समाजातील आहेत.
भाजपने उमेदवारी जाहीर करताना सामाजिक समिकरणेही जुळवून आणले आहेत. ओबीसी नेत्यांबरोबर दलित समाजालाही उमेदवारी दिली आहे. यातील अमित गोरखे हे नवे नाव आहे. ते पिंपरी चिंचवड येथील रहिवासी असून भाजपच्या आयटी सेलचे काम पाहतात. ते दलित समाजातून येतात.
पुण्यातून योगेश टिळेकर यांनाही उमेदवारी मिळाली आहे. टिळेकर हे भाजपचे हडपसरचे मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. ते भाजपच्या ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत.
तर रयत क्रांतीचे नेते सदाभाऊ खोत यांनाही विधानपरिषदेची उमेदवारी मिळाली आहे. महायुतीतील घटक पक्ष म्हणून भाजपने स्वतःच्या कोट्यातून खोत यांना उमेदवारी दिली आहे. सदाभाऊ खोत या पूर्वी विधान परिषदेवर होते. त्यांना भाजपने मंत्रिपदही दिले होते. तर डॉ. परिणय फुके यांना उमेदवारी मिळाली असून, ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आहे. फुके हे भंडारा जिल्ह्यातील आहेत.
पंकजा मुंडेंचा राजकीय वनवास संपणार
पंकजा मुंडे या भाजपमधून साइडलाइन झाल्या होत्या. त्यांना पुन्हा मुख्य प्रवाहाच्या राजकारणात आणण्यासाठी भाजपकडून प्रयत्न करण्यात येत होते. लोकसभेला प्रितम मुंडे यांचे तिकीट कापून ते पंकजा मुंडे यांना देण्यात आले होते. परंतु जातीय समीकरणे वेगळी ठरले. त्यात मराठा आरक्षणाचा आंदोलनाचा फटका पंकजा मुंडे यांना बसला. त्यात लोकसभेला साडेसहा हजार मतांनी पराभूत झाल्या. परंतु आता विधानपरिषदेच्या माध्यमातून त्यांचा राजकीय वनवास संपणार आहे. राज्यात मुंडे यांच्या रुपाने मोठा ओबीसी चेहरा आहे. येत्या विधानसभा निवडणुकीचा दृष्टीने हा चेहरा महत्त्वाचा आहे. त्या विधानसभा भाजपला जास्त जागा जिंकून देऊ शकतात. त्यामुळेच मुंडे यांना विधानपरिषदेवर घेण्यात आल्याचे बोलले जात आहे.
रावसाहेब दानवे, हर्षवर्धन पाटलांना संधी नाहीच
माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे लोकसभेला पराभूत झाले. ते विधानपरिषदेसाठी इच्छुक होते. तर भाजपमधील माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे विधानपरिषदेसाठी इच्छुक होते. परंतु त्यांच्या नावाला केंद्रातून पसंती मिळालेली नाही.
गेले 5 वर्षात अनेक वेळा मुंडे यांचे नाव चर्चेत असायचे परंतु ऐन वेळी झारीतील शुक्राचार्य आडवी यायचे..परंतु यावेळी मात्र खरच पंकजा मुंडे यांचे यादीत नाव झळकल्याने मुंडे समर्थकांत उत्साहाचे वातावरण पसरले आहे.
0 टिप्पण्या