Ticker

6/Breaking/ticker-posts

हेडकॉन्स्टेबल मच्छिंद्र घाणे सेवानिवृत्त


लोकनेता  न्यूज

    (ऑनलाईन न्यूज नेटवर्क ) 

शेवगाव : शेवगाव पोलीस स्टेशनला नेमणुकीस असलेले हेड कॉन्स्टेबल मच्छिंद्र दामू घाणे हे साडेचौतीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर दि.३१ मे रोजी निवृत्त झाले.

दि.१५ जुलै १९८९ ला ते लातूर जिल्हा पोलीस दलात कॉन्स्टेबल म्हणून भरती झाले.सन १९९१ ला ते नगरला बदलून आले.अहमदनगर नियंत्रण कक्ष,एलसीबी वॉरंट बजावणी पथक तसेच पाथर्डी,सोनई,नेवासा व शेवगाव पोलीस स्टेशन येथे त्यांनी उत्कृष्ट सेवा बजावली.येथे ट्रॅफिक हेडकॉन्स्टेबल पदावरून ते निवृत्त झाले.

जिल्हा आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षिका रोहिणी साबळे - घाणे यांचे ते पती आहेत.सेवापुर्ती निमित्त त्यांचा नगर येथे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या हस्ते तर,शेवगाव येथे एपीआय अनिल पवार यांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या