Ticker

6/Breaking/ticker-posts

अरणगाव बाह्यवळण रस्त्यावर भीषण अपघात; २ ठार ४ जखमी



लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)


अ. नगर: दि. 22 जून 

बाह्यवळण रस्त्यावर अरणगाव परिसरात आज शनिवारी सकाळी आठ वाजता  ट्रक-कटेंनर व स्विफ्ट या तीन वाहनांचा भीषण अपघात झाला. या अपघातात तीन २ जागीच ठार तर ४ जण गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच अरणगाव ग्रामस्थांसह नगर तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.


शनिवारी सकाळी बाह्यवळण रस्त्यावर अरणगाव परिसरात ट्रक व कंटेनरचा अपघात झाला. त्याचवेळी  पाठिागून स्विफ्ट कार या वाहनावर जोरात धडकली. यात तीघांचा मृत्यू झाला. याच ठिकाणी गेल्या आठ दिवसांपूर्वी दोन वाहनांचा अपघात झाला होता. त्यात दोन जण जखमी झाले होते.


त्यानंतर शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले यांच्या नेतृत्वाखाली रास्तारोको आंदोलन केले होते. साईड पट्या, सर्व्हिस रोड, दिशादर्शक फलक लावण्याच्या आश्‍वासनानंतर कार्ले यांनी आंदोलन मागे घेतले होते. परंतु अद्यापही उपाययोजना झाल्या नाहीत. 


आज झालेल्या अपघातील मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू होते. अपघातामुळे वाहनांच्या लांबपर्यंत रांगा लागल्या होत्या.  सार्वजनिक बांधकाम विभाग व एनएचआयकडून अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्याचे काम सुरु आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या