Ticker

6/Breaking/ticker-posts

बाजारपेठेतील "त्या" अतिक्रमण हटाव आदेशालाऔरंगाबाद खंडपीठाची स्थगिती..


 अनेक  व्यापाऱ्यांना मिळाला दिलासा..!

   




लोकनेता  न्यूज

    (ऑनलाईन न्यूज नेटवर्क ) 



शेवगाव/पाथर्डी :
पाथर्डी तालुक्यातील एक नावाजलेली  व्यापारी बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या तिसगाव येथील गट नंबर 296 मधील व्यापाऱ्यांना उद्या दि 23 मे सायंकाळी पाच वाजेपर्यंत सर्व अतिक्रमण काढून घेण्याचे आदेश पाथर्डी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शिवाजी कांबळे यांनी दिले होते. या विरोधात व्यापारी न्यायालयात गेले होते.  या प्रकरणावर औरंगाबाद खंडपीठाचे न्यायाधीश संजय देशमुख यांच्या समोर  सुनावणी झाली. त्यानंतर त्यानंतर दि १३ जून पर्यंत या कारवाईला स्थगिती देण्यात आली.  या निर्णयामुळे कोंडीत सापडलेल्या व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.


यासंदर्भात गट नंबर 296 मधील काही गाळेधारक व्यावसायिक यांनी दिनांक 21 मे रोजी औरंगाबाद खंडपीठात गाळेधारक व्यवसायिकांचे ज्येष्ठ विधीतज्ञ अॅड आदिनाथ जगताप यांनी बाजू मांडली. त्यानंतर दिनांक 22 मे रोजी या प्रकरणावर औरंगाबाद खंडपीठाचे न्यायाधीश संजय देशमुख यांच्या समोर या अतिक्रमण संदर्भात सुनावणी झाली आणि त्यानंतर दि १३ जून पर्यंत या कारवाईला स्थगितीचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती अँड जगताप यांनी दिली. 

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने गट नंबर २९६ मधील अतिक्रमण संदर्भात दिलेल्या आदेशामुळे या गट नंबर मधील व्यापारी तसेच इतरही सर्व लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तिसगाव येथील गट नंबर 296 मधील व्यवसायिकांना व घरकुल लाभार्थ्यांना राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सुजय विखे पाटील, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, माजी सभापती काशिनाथ पाटील लवांडे, जि प सदस्य पुरुषोत्तम आठरे यांना भेटून या प्रकरणात  सहकार्य करण्याची विनंती केली होती.आणि त्यांनी देखील सहकार्याची भूमिका घेतली. 

मार्केट कमिटीचे संचालक अरुण रायकर, ग्रामपंचायत सदस्य डॉक्टर काशिनाथ ससाने, शिवाजी सावंत सर, संदीप बर्डे यांनी सातत्याने पाठपुरावा करून या सर्व व्यावसायिकांना, गरीब, गरजू कुटुंबियांना या न्याय देण्याची भूमिका घेतलेली आहे. 

व्यापाऱ्यांची पंचाईत अन प्रशासनाची गोची प्रशासनाकडून स्पीकरद्वारे अतिक्रमणधारकांना आवाहन,, गुरुवारी 23 मे रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यन्त गट नंबर 296 मधील 401 लोकांना स्वतःहून अतिक्रमण काढून घेण्याची मुदत संपत असल्यामुळे तालुका प्रशासनाने बुधवारी तिसगावमध्ये स्पीकरद्वारे या गट नंबर मधील व्यवसायिकांना अतिक्रमण काढून घेण्याचे आवाहन केले जात होते.त्यामुळे व्यवसायिकांमध्ये आणखीनच अस्वस्थता पसरली होती. दरम्यान सायंकाळी न्यायालयाचे स्थगिती आदेश आल्यामुळे दिलासा मिळाला असून तालुका प्रशासनाचि चांगलीच गोची झाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या