लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
शेवगाव,(जि.नगर) : योगतज्ञ प.पू.दादाजी वैशंपायन यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली शेवगावची ' दत्तभूमी ' तीर्थक्षेत्र म्हणून नावारुपास येण्यासाठी तसेच साधक व दत्तभक्तांना अधिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन स्तरावर सर्वतोपरी प्रयत्न केले जातील,असे प्रतिपादन आ.मोनिकाताई राजळे यांनी केले.
प.पू.दादाजी वैशंपायन यांच्या १०५ व्या जयंतीचे औचित्य साधून गुरुदत्त सामाजिक संस्थेच्या वतीने प्रतिवर्षी दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय अध्यात्मिक व सामाजिक कार्य गौरव पुरस्कार वितरण कार्यक्रमात आ.राजळे अध्यक्षपदावरून बोलत होत्या.स्वामी समर्थ कृपांकित प.पू.नारायण भाटे (पुणे),नाथ संप्रदायाचे संशोधक व प्रवचनकार मिलिंद चवंडके(नगर) यांना आध्यात्मिक तर,महंत निश्चलपुरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.धर्मवीर भारती (लातूर) यांना सामाजिक कार्य गौरव पुरस्काराने अनुक्रमे प.पू.गजानन कस्तुरे (नाशिक)आ. राजळे,वित्त विभाग एमएसडीएल (मुंबई)चे संचालक अनुदीप दिघे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.मानपत्र,सन्मानचिन्ह,महावस्त्र, शाल,पुष्पहार तसेच प्रत्येकी अकरा हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
अनेक प्रकारचे दुःख झेलत विविध क्षेत्रात समर्पित भावनेने काम करणाऱ्या पुरस्कारर्थीचा गौरव करणाऱ्या गुरुदत्त संस्थेचे त्यांनी कौतुक केले.दादाजींना अभिप्रेत असलेले निस्वार्थ सेवेचे कार्य होत असल्याबद्दल त्यांनी पदाधिकाऱ्यांच्या पाठीवर शाब्बासकीची थाप देत शुभेच्छा दिल्या.ज्येष्ठ साधक पी.बी.शिंदे यांनी नर्मदा परिक्रमा पूर्ण केल्याबद्दल त्यांचाही यावेळी आ.राजळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी गुरुदत्त संस्थेचे अध्यक्ष अर्जुनराव फडके,सचिव फुलचंद्र रोकडे,ज्येष्ठ साधक शरद वैशंपायन,अतुल पवार,रवींद्र पुसाळकर,प्रशांत दिघे,उदय देशपांडे तसेच जेष्ठ कार्यकर्ते अभय आव्हाड,नंदकुमार शेळके,अँड.विजयराव काकडे, अँड.संजय सानप,महेश फलके,बंडू रासने,अनिल पुरी,उप अभियंता प्रल्हाद पाठक, इंजि.बाळासाहेब मुरदारे तसेच गुरुदत्त संस्थेचे सेवाभावी कार्यकर्ते सर्वश्री पी.बी.शिंदे,बाबुशेठ जोशी,सुरेश घुले,मनीष बाहेती,लक्ष्मण काळे, निलेश रोकडे,संजय कुलकर्णी, प्रदीप हारके,जगन्नाथ गोसावी, निवृत्ती गोरे,अभय पालवे, कृष्णमुरारी गाडे,महेश देशमुख,वैभव भोर,योगेश तायडे,अमित आहुजा,प्रशांत गोसावी,बन्सी पांगरे,सुभाष गोलांडे,ओमप्रकाश बाहेती,पुरुषोत्तम धूत,योगेश रोकडे,शेखर रोकडे आदी उपस्थित होते.स्वागत व प्रास्ताविक दिलीप फलके यांनी तर,आभार प्रदर्शन काकासाहेब लांडे यांनी केले.
पुरस्काराची रक्कम ' गुरुदत्त ' ला साभार परत
गुरुदत्त सामाजिक संस्थेच्या अजोड कार्याची दखल घेत डॉ.धर्मवीर भारती(लातूर)यांनी पुरस्काराच्या ११ हजार रकमेत आणखी वीस हजाराची भर घालून रोख ३१ हजार रुपये तर,प.पू.नारायण भाटे (पुणे)यांनी ११ हजार रुपये संस्थेचे अध्यक्ष अर्जुन फडके व सचिव फुलचंद रोकडे यांच्याकडे सुपूर्द केले.
0 टिप्पण्या