लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
सावेडी, अ.नगर : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक परिवर्तनामध्ये सर्वश्रेष्ठ योगदान असुन त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी अविरतपणे ग्रंथ वाचन करायला हवे असे प्रतिपादन शब्दगंध साहित्यिक परिषदेचे संस्थापक सचिव सुनील गोसावी यांनी व्यक्त केले.
वॉरियर्स फाउंडेशन व संत वामनभाऊ सार्वजनिक वाचनालय, सूर्य नगरच्या वतीने आयोजित डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती समारंभात ते अध्यक्षपदावरून बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले कि, गरीब श्रीमंत दरी कमी होणे गरजेचे आहे. वाचनाने माणूस सुसंस्कृत बनतो आणि आपल्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या जातात. वाचन लेखनाने माणूस समृद्ध बनतो, हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे, त्यांचा आदर्श नव्या पिढीने घ्यायला हवा.
यावेळी वॉरियर्स फाउंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला गोसावी, संत वामनभाऊ सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष, पोपट सांगळे , वॉरियर्स फाउंडेशनच्या संगिता गिरी, स्मृती घोडेस्वार, वर्षा गुजर, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. तसेच उपस्थित नागरिक, पालक, विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले.
0 टिप्पण्या