लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
शेवगाव : मराठी भाषा संवर्धन तसेच ग्रंथालय चळवळ अधिक गतिमान करून वाचकांना स्थानिक ग्रंथालयामार्फत नियतकालिके तसेच वाचनीय ग्रंथसंपदा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने शेवगाव तालुका ग्रंथालय संघाची स्थापना करण्यात आली असून ग्रंथालय चळवळीतील जेष्ठ कार्यकर्ते जगन्नाथ गोसावी (वरुर) यांची अध्यक्षपदी, हरीश भारदे(शेवगाव) यांची कार्याध्यक्षपदी तर, कैलास बुधवंत (निबेंनांदूर) यांची सचिवपदी सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
संघाची अन्य कार्यकारणी याप्रमाणे : उपाध्यक्ष - बाळासाहेब सोनवणे (आखतवाडे), रामकिसन कराड(वडुले बुद्रुक), सहसचिव - अकबर सय्यद (क-हेटाकळी) खजिनदार - कुंडलिक घुगे (घोटण) यांची निवड करण्यात आली.
कार्यकारिणी सदस्यांमध्ये -जमीर पठाण (भातकुडगाव), नितीन फुंदे (गोळेगाव), विजयकुमार लड्डा (खुंटेफळ), संतोष मेरड( देवटाकळी), नानासाहेब मडके (गदेवाडी), हरिचंद्र वांढेकर (सामनगाव), सर्फराज सय्यद (आव्हाणे), किसनराव चव्हाण (रांजणी) आदींचा समावेश करण्यात आला आहे.
ग्रंथालय संघाची शासनाच्या सार्वजनिक न्यासाकडे नोंदणी करण्यात येणार असून शेवगाव तालुक्यातील सर्वच्या सर्व ५० ग्रंथालयांना सभासदत्व दिले जाणार आहे.संघाच्या माध्यमातून ग्रंथालय तसेच ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्याबरोबरच मराठी भाषा संवर्धन व वाचन संस्कृती विकसित करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.राज्य सरकारकडून मिळणाऱ्या तुटपुंज्या अनुदानावर ही चळवळ तग धरुन आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, उप सचिव प्रताप लुबाळ, राज्याचे प्रभारी ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांची ग्रंथालय चळवळीबाबत सकारात्मक भूमिका आहे.
चळवळ बदनाम करणाऱ्यांचा निषेध
शासनाच्या या धोरणामुळे ग्रंथालयांना बळ मिळत आहे. मात्र,काही विघ्नोसंतोशी मंडळी या चळवळीला तसेच प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना बदनाम करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. या प्रवृत्तीचा बैठकीत निषेधाचा ठराव संमत करण्यात आला.
0 टिप्पण्या