Ticker

6/Breaking/ticker-posts

२०२६ पासून भगवान गडाच्या जबाबदारीतून मुक्त होणारं : :ह. भ. प. डॉ. नामदेव शास्त्री

.



लोकनेता  न्यूज

    (ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

टाकळीमानुर :     विक्रम केदार

जबाबदारी असणार आणि जबाबदार असणार हे महत्त्वाचं आहे. पदे येतील जातील , पण संत परंपरेची जाणीव ठेवत 2026 मध्ये होणाऱ्या भगवान    गडाच्या अमृत महोत्सव च्या वेळी या गादीच्या जबाबदारीतून मुक्त होणार आहे. अशी घोषणा न्या. ह. भ. प. डॉ. नामदेव शास्त्री यांनी केली.


ते पुढे म्हणाले, गादीचे महत्त्व राहिले पाहिजे. ज्ञानेश्वर माऊली पासून संप्रदाय सुरवात होते. म्हणून भगवानगडावर माऊलीचे मंदिर पूर्णत्वाकडे येईल याकरिता सर्व समाजानें एकत्र येण्याची गरज आहे असे आग्रही प्रतिपादन भगवान गडाचे महंत डॉ. नामदेव शास्त्री यांनी केले


पाथर्डी तालुक्यातील टाकळीमानुर येथे वैराग्यमूर्ती श्री संत वामनभाऊ महाराज ऐश्वर्या संपन्न संत भगवान बाबा महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित सप्ताहाच्या निमित्ताने कीर्तनात ते निरूपन करतांना बोलताना शास्त्री बोलत होते.

चौकट

भगवान गडाच्या गादीवर बसल्यापासून प्रथमच डॉ. नामदेव शास्त्री महाराज टाकळी मानूर येथे आल्याने ग्रामस्थांनी त्यांच्या स्वागताची जयंत तयारी करत रथा मधून गावातून भव्य मिरवणूक काढ त गावात मिरवणूक पुष्पृष्टी केली

चौकट

मी सन 1980 पासून भगवानगड पाहत आहे. तेव्हापासून गडाची आजची बदललेली परिस्थिती अनेक मूलभूत विकासाचे परिणाम दिसत आहे. यामागे मठाधिपती डॉ. नामदेव शास्त्री महाराज यांची संकल्पना कारणीभूत ठरत आहे देशात कोठेच नाही, असे भव्य संत ज्ञानेश्वर महाराजांचे मंदिर भगवानगडावर साकारले आहे. साकारले जात आहे.याचा महाराष्ट्राला अभिमान आहे. डॉक्टर नामदेव शास्त्री यांनी 2026 मध्ये भगवानगडाच्या गादीवरून पाय उतार होण्याची घोषणा माझ्यासारख्या भगवान भक्तांच्या पचनी पडत नाही. तो त्यांचा वैयक्तिक निर्णय असेल भगवान बाबाच्या भक्ताच्या वतीने सर्वसामान्य भक्त म्हणून या निर्णयावर फेरविचार करण्याची जाहीर विनंती करत आहे

-ॲड. प्रताप ढाकणे

(प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस) 


यावेळी गहिनीनाथ शिरसाट, राजेंद्र नागरे बाबासाहेब ढाकणे, बप्पासाहेब शिरसाठ ,संदीप शिंदे ,अप्पासाहेब शिरसाठ ,पोपटराव शिरसाठ,  अण्णासाहेब शिरसाठ , निलेश मोनोत, राजेंद्र शिंदे आदी मान्यवर व ग्रामस्थ पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होत


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या