Ticker

6/Breaking/ticker-posts

संत वामनभाऊ पुण्यतिथी सोहळा अभुतपुर्व उत्साहात

 



लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)



चिंचपुर पां (श्री क्षेत्र गहिनीनाथ गड)

नगर व बीड जिल्ह्याच्या हद्दीवर असलेले संपूर्ण महाराष्ट्रात लाखोंच्या संख्येने भक्तगण असणारे वैराग्यमुर्ती संत वामनभाऊ महाराज यांच्या ४८ व्या पुण्यतिथी सोहळ्यास शुक्रवार (ता.२ फेब्रुवारी २०२४) रोजी मोठया उत्साहात प्रारंभ झाला.

शनिवार दि. ३ रोजी या सोहळ्याची सांगता होते. यानिमित्ताने  महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री  तसेच उपमुख्यमंत्री  , कृषी व बीडचे पालक मंत्री धनंजय मुंडे तसेच माजी मंत्री पंकजा मुंडे, बीडच्या खासदार प्रीतम मुंडे, आष्टीचे आमदार बाळासाहेब आजबे, माजी मंत्री आ. सुरेश धस, माजी आमदार भीमराव धोंडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.

 


त्यानिमित्ताने वामन  भाऊंच्या समाधीवर आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली असून मंदिरावर विद्दुत रोषणाई करण्यात आली आहे. 


पुण्यतिथीनिमित्त गडावर कालपासूनच मोठ्या संख्येने दिंड्या हजर झालेले आहेत. हजारो वारकरी या दिंड्यांमधून सायंकाळच्या जागर कार्यक्रमास उपस्थित झालेले आहेत . महंत ह भ प विठ्ठल महाराज यांच्या अध्यक्षतेखाली सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. गडावर व्हीआयपी साठी  हेलिपॅड उभारण्यात आले आहेत. परंपरेप्रमाणे वैराग्यमूर्ती संत वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त श्री. क्षेत्र गहिनीनाथगड ता.पाटोदा येथील पारंपरिक महापूजा सकाळी होणार असून त्यानंतर महंत विठ्ठल महाराज यांचे काल्याचे कीर्तन  होईल. त्यानंतर समाधीवर सकाळी ठीक अकरा पंचेचाळीस वाजता पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. यावेळी लाखोंचा भक्त परिवार राज्यभरातून उपस्थित  रहाणार आहे.


दरम्यान सोहळ्याला येणारे व्हीआयपी राजकीय मंडळी आणि मोठ्या संख्येने भाविकांची संख्या लक्षात घेता नियोजन करण्यात आले आहे.   अनेक मंत्री या ठिकाणी पुण्यतिथी सोहळ्यास उपस्तीत रहाणार असल्याने गहिनीनाथ गडावर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.


भविंकांच्या वाहनांसाठी चारही बाजूंच्या रस्त्यांवर गडापासून ३ किमीवर पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांनी आपली वाहने पार्किंग करून शिस्तबध्द रितीने सोहळ्यात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या