लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
शेवगाव : जनतेच्या ज्वलंत व न्याय्यप्रश्नी आंदोलनाचे हत्यार उपासनारे तसेच सातत्याने विविध सामाजिक,सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात आघाडीवर असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष गणेश रांधवणे यांच्या पुढाकारातून शेवगावच्या माळी गल्लीतील ३१५ नागरिकांना आयुष्यमान भारत जन आरोग्य योजनेच्या कार्डचे वाटप तहसीलदार प्रशांत सांगडे व शेवगाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष कैलास बुधवंत तसेच महाराष्ट्र राज्य तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन सातपुते यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रत्येक नोंदणीकृत कुटुंबाला आयुष्यमान भारत जन आरोग्य योजनेअंतर्गत कार्ड वितरणाची व्यापक मोहीम शासन पातळीवर हाती घेण्यात आली आहे.या योजनेअंतर्गत भारत सरकार तर्फे पाच लाखापर्यंत आरोग्य विषयक सेवा मोफत दिल्या जातात.श्री रांधवणे यांनी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत या योजनेचा लाभ मिळावा,यासाठी स्वतः जातीने लक्ष घालून कार्डचे वितरण करण्यासाठी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्त्या वसुधा सावरकर, राजश्री रसाळ,रमेश डाके,सुजाता खेडकर तसेच माळी गल्लीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रास्ताविक गणेश रांधवणे यांनी केले.सत्यविजय शेळके यांनी सूत्रसंचालन तर,निवृत्ती आधाट यांनी आभार मानले.
0 टिप्पण्या