Ticker

6/Breaking/ticker-posts

छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रत्येक तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी पुर्णाकृती पुतळा : ना. विखे पाटील

लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)   


नगर: आराध्य दैवत असलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रत्येक तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी पुर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे. या पुतळयाच्या उभारणीसाठी आवश्यक असलेला निधी जिल्हा नियोजन समितीतून देण्यात येणार असुन पुतळा उभारणीसाठी आवश्यक असलेली जागेचा अहवाल येत्या आठ दिवसांमध्ये सादर करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी प्रशासनाला दिले.

इतिहासाचा साक्षीदार असलेला भुईकोट किल्ला आजघडीला सैन्याच्या ताब्यात आहे. हा किल्ला राज्य सरकारच्या ताब्यात घेण्यासाठी शासनाकडून प्रयत्न करण्यात येतआहे.  या किल्ल्याच्या विकासासाठी 95 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहितीही पालकमंत्री श्री विखे पाटील यांनी यावेळी दिली.

  बैठकीमध्ये श्री महेश्वर मंदिर, कोळपेवाडी ता. कोपरगाव, श्री अमृतेश्वर महादेव मंदिर, माहेगाव देशमुख ता. कोपरगाव, श्री दत्त मंदिर देवस्थान विठे ता. अकोले, श्री खंडोबा देवस्थान हिररगाव पावसा ता. संगमनेर, श्रीसंत तुळशीराम महाराज देवस्थान, मुठेवडगाव ता.श्रीरामपुर, हरेश्वर देवस्थान, कर्जुले हर्या ता. पारनेर व  श्री शनिमंदिर ता. श्रीगोंदा या ग्रामीण तीर्थक्षेत्रांना क वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात आला. 
यावेळी प्रशासनातर्फे तयार करण्यात आलेल्या अमृतसरोवर या कॉफीटेबलबुकचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. तसेच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटूंबियांना कृषीकिटचे वाटपही करण्यात आले. 
यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधींनी रस्ते, वीज वितरण, आरोग्य यासह जिल्ह्यातील विविध विकासकामांबाबत उपयुक्त अशा सुचना मांडल्या.बैठकीस सर्व विभागांचे प्रमुख अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

स्व. मुंडे स्मारकासाठी निधी 
भाजपा नेते स्व.गोपीनाथ मुंढे यांच्या स्मारकाची उभारणी करण्याची मागणी  होती. या स्मारकाच्या उभारणीसाठी निधी उपलब्ध करून देणार असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या