लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
मुंबई: क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात सलग ९ सामने जिंकून अपराजित राहण्याचा पराक्रम करणाऱ्या भारतीय संघापुढे बलाढ्य न्यूझीलंड संघाचे आव्हान आहे. त्यामुळे फायनलमध्ये जाण्यासाठी थरार रंगणार आहे.
या स्पर्धेतील अजिंक्य भारतीय संघाच्या आशा उंचवल्या आहेत. तथापि २०१९ च्या स्पर्धेत अशाच सेमीफायनलमध्ये न्यूझीलंड संघाने भारताची विजयी घोडदौड रोखली होती. या स्पर्धेतही पुन्हा एकदा भारताची गाठ न्यूीलंडविरुद्ध पडली आहे, हा खेळातील योगायोग. मात्र यावेळी त्यावेळच्या पराभवाचा वचपा काढून चोकर्सचा शिक्का पुसून काढण्याची संधी भारताला आहे.
योगायोग असा की, ज्यांना पूर्वी चोकर्स म्हणून हिणवले जायचे त्या दक्षिण आफ्रिका संघानेही यंदा सेमीफायनल गाठली आहे. त्यांचा सामना ऑस्ट्रेलियाशी उद्या गुरुवारी होत आहे. तोही सामना तुल्यबळ होईल.
तत्पूर्वी आज दुपारी मुंबईत होणारा भारत - न्यूझीलंड सामना हाय हॉल्ट होणार आहे. यात कोण व कशी बाजी मरतो याची उत्कंठा शिगेला पोहचली आहे. त्यामुळे अवघ्या दोन तासावर येऊन ठेपलेल्या या समन्याकडे तमाम क्रिकेट चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत.
0 टिप्पण्या