Ticker

6/Breaking/ticker-posts

पुस्तकी ज्ञानाबरोबरच अनुभवातून व्यक्तिमत्व घडते : शुभम निकम



प्रवरा पब्लीक स्कूलचे वार्षिक स्नेह संमेलन

लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

लोणी  (प्रतिनिधी) :

शालेय पातळीवर मिळणारे पुस्तकी ज्ञान आणि मिळणारे अनुभव यातुनचं व्यक्तिमत्व  घडत असते. प्रामाणिक कष्ट आणि अभ्यास केल्यास यश निश्चित  मिळत असल्याचे   प्रतिपादन भारतीय रेल्वे विभागातील  वरीष्ठ सहाय्यक अभियंता आणि माजी विद्यार्थी शुभम निकम यांनी केले.

    लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरानगर येथील प्रवरा सेंट्रल पब्लीक स्कुलच्या  वार्षिक स्नेह संमेलन आणि पारितोषिक वितरण कार्यक्रमात शुभम निकम बोलत होते. यावेळी संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुश्मिता विखे पाटील, संस्थेचे संचालक मच्छीद्र पावडे, गोविंद जवरे. दिलीप इंगले, शिक्षण संचालिका सौ. लिलावती सरोदे, प्राचार्या डॉ रोजमीन बेलीन,  कंमाडर शेखर जोशी, रेखा रत्नपारखी, सुधीर मोरे, डॉ. बी. बी अंबाडे, भारती कुमकर आदीसह विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते. 



   यावेळी बोलतांना शुभम निकम म्हणाले ,शिक्षणासोबतचं प्रवरेच्या माध्यमातून सर्वगुणसंपन्न विद्यार्थी घडविला जातो. जय-पराजय यातून यश प्राप्ती होत असते. सकात्मक विचार करून विद्यार्थ्यांनी पुढे जावे असे सांगून प्रवरेतून मिळालेल्या प्रेरणेतूनच  मला यश मिळाले असल्याचा आवर्जून उल्लेख  केला.

 डॉ. सुश्मिता विखे पाटील म्हणाल्या, प्रवरेचा उद्देश हा आदर्श नागरीक घडविणे हाच राहीला असून यावर्षीची संकल्पना ही महाराष्ट्राचे  दुर्ग वैभव गाथा उज्ज्वल इतिहासाची असल्याचे सांगून याद्वारे गड किल्ले आणि त्याचा इतिहास विद्यार्थ्यापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करतांनाच गड किल्लाची सफर ही विद्यार्थ्यांना घडविणार असल्याचे सांगितले.

 

यावेळी वर्षभरात विविध क्षेत्रात यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांचा गौरवही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. सांस्कृतिक कार्यक्रमातून मुलांनी सादर केलेल्या विविध गुणदर्शन कार्यक्रमाला पालकांनी उत्स्फूर्त  प्रतिसाद दिला.

   

कार्यक्रमाचे प्रास्ताविक  प्राचार्या डॉ. रोजमीन बेलीन यांनी शाळेच्या विविध उपक्रमाची माहीती देऊन अहवाल वाचल केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्राची चव्हाण आणि कु. रोजमीन शेख यांनी तर आभार प्रा. पी. के गागरे यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या