लॉयर्स सोसायटीच्या २०२४ वर्षाच्या डायरीचे प्रकाशन
लॉयर्स को-ऑप सोसायटीच्या २०२४ वर्षाच्या डायरीचे प्रकाशन जिल्हा न्यायाधीश सुनील गोसावी. समवेत जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील, सोसायटीचे चेअरमन अॅड.भूषण बऱ्हाटे, व्हाईस चेअरमन हाफिज जहागीरदार, सचिव अॅड.वृषाली तांदळे, शहर वकिल संघटनेचे अध्यक्ष अॅड.संजय पाटील, सेन्ट्रल बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड.किशोर देशपांडे आदींसह सोसायटीचे संचालक व वकील सभासद
लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
नगर – जग अतिशय गतिमान झाले आहे. कोणालाही थांबायला वेळ नाहीये. त्यामुळे वकिलांनी आलेल्या संधीचे सोने करून वेगाने खटले चालवावेत. सर्व वकिलांसाठी लॉयर्स सोसायटीची नवी डायरी लाभदायी ठरो व जास्तीत जस्त केसेस मिळो या सदिच्छा देताना वाकीलांकडून जास्तीत जास्त खटल्यांचा निपटारा लवकरात लवकर होवो अशीही अपेक्षा करतो. लॉयर्स सोसायटीची डायरी वकीलांसाठी भूतकाळाचा पाऊलखुणा दाखवणारी व भविष्याचा वेध घेणारी आहे, असे प्रतिपादन जिल्हा न्यायाधीश सुनील गोसावी यांनी केले.
जिल्हा न्यायालयात अहमदनगर लॉयर्स को-ऑप सोसायटीच्या २०२४ वर्षाच्या डायरीचे प्रकाशन जिल्हा न्यायाधीश सुनील गोसावी यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील, सोसायटीचे चेअरमन अॅड.भूषण बऱ्हाटे, व्हाईस चेअरमन हाफिज जहागीरदार, सचिव अॅड.वृषाली तांदळे, शहर वकिल संघटनेचे अध्यक्ष अॅड.संजय पाटील, सेन्ट्रल बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड.किशोर देशपांडे आदींसह सोसायटीचे संचालक व मोठ्या संख्यने वकील सभासद उपस्थित होते. न्यायाधीश सुनील गोसावी यांच्या हस्ते उपस्थित सदस्यांना डायरींचे वाटप करण्यात आले.
प्रास्ताविकात अॅड.भूषण बऱ्हाटे म्हणाले, लॉयर्स सोसायटी आता डीजीटल झाली आहे. त्यामुळे स्टॅम्प विक्रीतून मिळणारे उत्पन्न कमी झाले असले तरी सभासदंना सालाबादप्रमाणे वर्षभर उपयुक्त ठरेल अशी डायरी लाभांश रूपाने दिली आहे. या डायरीत विविध उपयुक्त माहिती बरोबरच सर्व वकील सभासदंचे मोबाईल नंबर दिले आहेत. प्रत्येक पानावर विविध कायदे विषयक माहिती व कोर्ट फीची माहिती दिली असल्याने सर्व वकिलांसाठी ही डायरी खूप उपयुक्त ठरणार आहे. यासाठी सोसायटीच्या सर्व संचालकांनी सहकार्य केले आहे.
यावेळी सरकारी वकील सतीश पाटील, अॅड.संजय पाटील व अॅड.किशोर देशपांडे यांनी लॉयर्स सोसायटीच्या कारभाराचे कौतुक करून उपक्रमास शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास लॉयर्सचे संचालक अॅड.अनिता दिघे, अॅड.लक्ष्मण कचरे, अॅड.विनायक सांगळे, अॅड.नामदेव वाकळे, अॅड.चंदन बारटक्के, अॅड.संदीप पाखरे, अॅड.संदीप पडोळे, संदीप काळे, अश्विनी पवार, सुधीर कुलकर्णी, रविंद शितोळे असिंसह कौटुंबिक न्यायालय बारचेअध्यक्ष अॅड.शिवाजी कराळे, ग्राहकमंच न्यायालय बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड.सुनील मुंदडा, बचाव पक्षाचे वकील अॅड.अनिल सरोदे, अॅड.सुरेश लगड, माजी चेअरमन अॅड.नानासाहेब पादीर, ज्येष्ठ विधिज्ञ अशोक कोठारी, सुभाष काकडे व रमेश कराळे आदींसह वकील सभासद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड. वृषाली तांदळे यांनी केले तर आभार रावसाहेब बर्डे यांनी मानले.
0 टिप्पण्या