लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क
शेवगाव : मूळचे भारजवाडी, (ता.पाथर्डी) येथील रहिवासी असलेले अँड.निळकंठ बटुळे यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात सहाय्यक सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली आहे.महाराष्ट्र शासनाच्या न्याय व विधी विभागाने याबाबतचे आदेश नुकतेच पारित केले.ते श्रीक्षेत्र भगवान गडाचे माजी विश्वस्त (स्व.)त्रिंबकराव बटूळे यांचे नातू तर,शेवगावचे ज्येष्ठ नामांकित वकील श्री.द्वारकानाथ बटुळे यांचे चिरंजीव आहेत.अवघ्या ३४ व्या वर्षी त्यांनी हे संपादन केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.
अँड.निळकंठ बटुळे यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण शेवगावमध्ये झाले.त्यांनी पुणे येथे हॉटेल मॅनेजमेंटचा अभ्यासक्रमही पूर्ण केला तसेच पुढे आय.एल.एस.लॉ कॉलेजमध्ये एलएल.बी चे शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी इंग्लंड येथे एलएल.एम (Master of Low) ही कायद्याची पदवी प्राप्त केली.
ज्येष्ठ विधीज्ञ श्री.अभिजीत जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात दोन वर्षे वकिलीचे शिक्षण घेतले. त्यानंतर ते ज्येष्ठ विधीज्ञ श्री.शरद नातू यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती संभाजीनगरच्या उच्च न्यायालयात वकिली व्यवसाय करत असताना त्यांची नव्याने येथे सहाय्यक सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यांच्या या यशाबद्दल श्रीक्षेत्र भगवानगडाचे महंत न्यायाचार्य डॉ.नामदेव शास्त्री महाराज व माजी न्यायमूर्ती तथा गोव्याचे लोकपाल श्री.अंबादास जोशी यांचे त्यांना आशीर्वचन लाभले.
0 टिप्पण्या