Ticker

6/Breaking/ticker-posts

राज्यस्तरीय कथालेखन स्पर्धेमध्ये सुनील गोसावी प्रथम

 












लोकनेता  न्यूज

    (ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

अहमदनगर - अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर नगरपंचायत, नगरपरिषद व महानगरपालिकांमध्ये कार्यरत  अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी महाराष्ट्र राज्य मुख्याधिकारी संघटनेच्या वतीने नागरी साहित्य लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेमध्ये देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी सुनील गोसावी यांना कथालेखन स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक जाहिर झाले आहे.


       महाराष्ट्रातील नागरी भागात कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांच्या साहित्यिक लेखनास प्रोत्साहन देण्यासाठी आणि वाचन संस्कृती रुजवण्यासाठी महाराष्ट्र राज्य मुख्याधिकारी संघटनेने महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवा अधिकारी संघटनेच्या वतीने साहित्य स्पर्धा आयोजित केली होती. कथा लेखन, कविता लेखन, लेख लेखन अशा तीन प्रकारात या स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेमध्ये स्वच्छता कर्मचारी, शिपाई , सहा.प्रकल्प अधिकारी, मुख्याधिकारी, आयुक्त पदावरील अधिकाऱ्यांसह सर्व कर्मचारी, अधिकारी सहभागी झाले होते. या स्पर्धेचे परीक्षण जेष्ठ साहित्यिक नीलिमा फाटक यांनी केले.

    संघटनेचे अध्यक्ष गणेश देशमुख व  प्रशांत रसाळ यांनी निकाल जाहीर केलाआहे. सुनील गोसावी यांनी या स्पर्धेसाठी 'बचत गटाचा डंका' ही बचत गटामुळे झालेल्या प्रगतीचा आढावा घेणारी कथा पाठवली होती. बसत गटाच्या चळवळीमुळे महिलांचे सक्षमीकरण होत असून महिला कुटुंबासह स्वयंपूर्ण बनत आहेत. हा संदेश या कथेतून देण्यात आला आहे.


  राज्यस्तरीय कथालेखन स्पर्धेमध्ये सुनील गोसावी यांना पारितोषिक जाहीर झाल्याबद्दल  नगरपरिषद प्रशासनाचे सहा. आयुक्त प्रशांत खांडकेकर, देवळालीप्रवरा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तुषार आहेर, नेवासा नगरपंचायतचे मुख्याधिकारी अंबादास गर्कळ, प्रशासकीय अधिकारी सुदर्शन जवक,रामदास म्हस्के,शब्दगंध साहित्यिक परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र उदागे यांनी अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या