Ticker

6/Breaking/ticker-posts

दादाजी वैशंपायन यांच्या आध्यात्मिक कार्याला सेवा धर्माची दिलेली जोड कौतुकास्पद : तहसीलदार प्रशांत सांगडे




   लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

शेवगाव :  योग ज्ज्ञ दादाजी वैशंपायन यांच्या आध्यात्मिक कार्यास सेवा धर्माची जोड देऊन गुरुदत्त सामाजिक संस्थेने सामाजिक बांधिलकी जपली आहे. संस्थेचे गोरगरिबांसाठी अविरत सुरू असलेले कार्य कौतुकास्पद व प्रेरणादायी आहे, असे गौरवोदगार तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी काढले.

     येथील गुरुदत्त सामाजिक संस्था संचलित श्रीदत्त देवस्थानच्या मुंबई, ठाणे, पुणे व शेवगाव येथील ज्येष्ठ साधक समूहाच्या वतीने दिवाळी सणाचे औचित्य साधून शेवगाव शहर व तालुक्यातील १५० गरीब व गरजू कुटुंबांना किराणा सामान कीटचे तसेच प. पू. दादाजी वैशंपायन वृद्धाश्रमातील १५ आजी आजोबांना कपडे व साडी चोळीचे वाटप श्री. सांगडे यांच्या हस्ते करण्यात आले,त्यावेळी ते अध्यक्षपदावरून बोलत होते. 


कार्यक्रमास पोलीस निरीक्षक विलास पुजारी, सार्वजनिक बांधकाम खात्याचे उपविभागीय अभियंता प्रल्हाद पाठक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.



   यावेळी बोलताना श्री. पुजारी म्हणाले की, दादाजी वैशंपायन यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्री दत्तात्रेयांच्या पावनभूमीत गरीब व गरजू कुटुंबासाठी वर्षानुवर्ष सुरू असलेला दानयज्ञ सामाजिक सेवेची शिकवण देतो. गुरुदत्त संस्थेने दिवाळीच्या पूर्वसंध्येला किराणा मालाचे वाटप करून गरीब, वंचितांच्या चेहऱ्यावर फुलविलेले हास्य हीच खरी ईश्वर सेवा आहे.

     याप्रसंगी पंचायत समितीचे माजी सभापती अरुण पाटील लांडे, माजी उपसभापती संजय फडके, शाखा अभियंता संतोष पोतदार, गुरुदत्त संस्थेचे अध्यक्ष अर्जुनराव फडके, सचिव फुलचंदर रोकडे, अव्वल कारकून शशिकांत देऊळगावकर व श्रीकांत गोरे  तसेच श्रीदत्त देवस्थानचे सेवाभावी साधक हनुमान जोशी, लक्ष्मण काळे, संजय कुलकर्णी, निवृत्ती गोरे, योगेश रोकडे, निलेश रोकडे, अभय पालवे,पप्पू शेकडे,सोमनाथ गाडे, मधुरा फडके, अय्युब पठाण आदी उपस्थित होते. 


प्रास्ताविक जगन्नाथ गोसावी यांनी तर, सूत्रसंचालन दिलीप फलके यांनी केले. सुरेश घुले यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या