Ticker

6/Breaking/ticker-posts

एफआरपीप्रमाणे एकरकमी रक्कम देणारा केदारेश्वर पहिला कारखाना : माधवराव काटे

 केदारेश्वरचा सह. साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू



लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

बोधेगाव -शेतकऱ्यांचा ऊस गेल्यानंतर एफआरपी प्रमाणे तातडीने उसाचे एकरकमी पेमेंट देणारा केदारेश्वर हा पहिला साखर कारखाना असून यावर्षीच्या गळीत हंगामात देखील शेजारील कारखान्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या ऊसाला भाव देण्यात येईल. निसर्गाच्या लहरीपणामुळे मागील काही हंगामात केदारेश्वर कारखान्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले परंतु आता परिस्थिती अनुकूल असल्याने शेतकऱ्यांच्या ऊसाला जास्तीत जास्त भाव कसा देता येईल असा प्रयत्न आमचा राहील. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी आपला जास्तीत जास्त ऊस केदारेश्वर कारखान्यावर गाळपासाठी पाठवावा असे आवाहन संघर्षयोद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष माधवराव काटे यांनी केले.

     


   

शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील संघर्षयोद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ मार्गदर्शक संचालक प्रतापराव ढाकणे तसेच कारखान्याचे अध्यक्ष ऋषिकेश ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी दि. २७ रोजी कारखान्याचा सन २०२३/२४ चा गळीत हंगामाचा शुभारंभ कारखान्याचे ज्येष्ठ संचालक पांडुरंग काकडे तसेच त्यांच्या सुविद्य पत्नी सरस्वती काकडे यांच्या शुभहस्ते बॉयलरची विधिवत पूजा करून तसेच शेवगाव-पाथर्डीचे उपविभागीय अधिकारी प्रसाद मते तसेच त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. दिशाताई मते यांच्या शुभहस्ते गव्हाणीची विधिवत पूजा आर्चा करून उसाची मोळी गव्हाणीत टाकून गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष माधवराव काटे हे बोलत होते.


        यावेळी कारखान्याचे माजी उपाध्यक्ष डॉ. प्रकाश घनवट, सुरेशचंद्र होळकर, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे सेवानिवृत्त शास्त्रज्ञ सुभाष जमदाडे, सतीश जगदाळे, बंटी जगताप, मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विनकुमार  घोळवे,  प्रभारी कार्यकारी संचालक रमेश गर्जे, चीफ अकाउंट तीर्थराज घुंगरड, शेतकी अधिकारी अभिमन्यू विखे , मुख्य प्रशासकीय अधिकारी पोपटराव केदार, संचालक रणजित घुगे, संचालक बापूराव घोडके, बाळासाहेब फुंदे, प्रभाकर हुंडेकरी, अशोक तानवडे, शिवाजी जाधव, आयुब शेख, माजी संचालक सिताराम हुंडेकरी, अरविंद देशमुख, वसंतराव लांडे, काकडे सर, उद्योजक सतीश जगदाळे, बापूराव घोडके , कुंडलिक घुगे, संजय पाटेकर, शहाजी जाधव, अंबादास दहिफळे, सुधाकर खोले, बॉयलर फोर्मेन विष्णू खेडकर, मिल फोरमेन शहादेव तांदळे यांच्यासह आदी मान्यवर, ऊसतोड कामगार, शेतकरी, सभासद, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लीगल ऑफिसर शरद सोनवणे यांनी केले प्रास्ताविक कारखान्याचे उपाध्यक्ष माधवराव काटे यांनी केले तर आभार डॉ. प्रकाश धनवट यांनी मांनले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या