Ticker

6/Breaking/ticker-posts

वरुरला शारदीय नवरात्रोत्सवास प्रारंभ ; महिलांचा उतस्फूर्त सहभाग

 विविध स्पर्धांचे आयोजन ; महिलांचा लक्षणीय सहभाग 



   





लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

शेवगाव :  वरूर येथे ग्रामस्थांनी जीर्णोद्धार केलेल्या पुरातन रेणुकामाता मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक तसेच सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन उत्सव समितीने केले आहे.


     दररोज सकाळी श्री दुर्गा सप्तशती पारायण तसेच नवरात्रोत्सव काळात महिला व शालेय विद्यार्थ्यांसाठी संगीत खुर्ची, रंगभरण, सुंदर हस्ताक्षर, चालता बोलता प्रश्नमंजुषा, होम मिनिस्टर आदी स्पर्धात्मक कार्यक्रम होणार आहेत.


     'जागर स्त्री शक्तीचा', 'मोबाईल शाप की वरदान', 'संस्कृतीच्या पाऊलखुणा जपताना', 'आम्हास हवेत ऑफलाईन आई बाबा' आदी सामाजिक विषयांवर सिद्धी बाफना, पृथ्वीराज पोटफोडे, पूजा कोरडे, अमृता लव्हाट या विद्यार्थ्यांचे प्रबोधनपर व्याख्यान होणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांचा भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात येईल. महाप्रसादाने उत्सवाची सांगता होईल.


      उत्सव यशस्वीतेसाठी निलेश मोरे, गोरक्ष पठाडे, प्रसाद ओझा, संतोष खडके, संजय लव्हाट, ज्ञानेश्वर नवथर, आत्माराम म्हस्के, लखन म्हस्के, गणेश ओझा, महेश कोरडे आदी प्रयत्नशील आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या