लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर: आझादी का अमृत महोत्सवातंर्गत दिल्ली सरकारच्या ओबीसी आयोगाकडून देण्यात येणारा ‘राष्ट्रीय एकता पुरस्कार’ विश्व निर्मल फौंडेशनचे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा यांना दिल्ली येथील कॉन्सीटीट्यूशन क्लबमध्ये दिल्ली सरकार ओ बी सी आयोगाचे अध्यक्ष जगदीश यादव यांचे हस्ते स्मृती चिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
या वेळी आयोगाचे सचिव रंजीतसिंह कर्नल पूनम सिंग ,जीएसटी कमिशनर सारांश महाजन, प्रसिध्द गायक पंडित बलदेवराज वर्मा (इंदौर), निवृत्त जिल्हा न्यायाधीश पिंकी महाजन (दिल्ली) आदी उपस्थित होते. या वेळी संपूर्ण भारतातून एकूण ६० मान्यवरांना सन्मानित करण्यात आले.
या पुरस्काराबद्दल बोज्जा यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
0 टिप्पण्या