Ticker

6/Breaking/ticker-posts

शनिशिंगनापुरात शनिभक्तांची मंदियाळी


 श्रावणी शनिवारनिमित्त हजारोंचे शनिदर्शन

       
  लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)


सोनई-(विजय खंडागळे यांजकडून)  श्रावण महिन्याच्या पहिल्या शनिवारी आज  पहाटे 4 वाजल्यापासून परिसर, तालुक्यासह जिल्ह्य़ातील भाविकांची रीघ लागली होती.  चौथरा दर्शन,  जलाभिषेक करुन ओल्या वस्राने शनिदर्शन घेतले. दरम्यान देवस्थान प्रशासनाने घेतलेल्या दोन तास मोफत चौथारावरील शनिदर्शन निर्णयामुळे अलोट गर्दी दिसूनआली.

      
शनिवार नेहमीचे, व परिसरातील आणि  श्रावणी शनिवारच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या एकत्र येण्यामुळे   मंदिर  परिसरात  तोबा गर्दी झाली. दिवसभर भविकांचा ओघ सुरूच होता. शनिदेवाला श्रावण महिन्यात जलभिषेक करण्याची परंपरा असल्याने भाविकांनी स्नान करुन दर्शन घेतले. ठिकठिकाणी भाविकांना प्रसादचे वाटप करण्यात येत होते.

      *शनिदेवाला साकडे*
राज्याचे माजी मंत्री आ. शंकरराव गडाख, जिल्हा परिषद बांधकाम समितीच माजी सभापती सुनील गडाख, आदिनी भरपूर पाऊस पडू दे..व भरभरून पिकाची समृद्धि व्हावी, अशी प्रार्थना करुन शनीचरनी साकडे घातले*.

  भक्तिमय वातावरण 
       *ग्रामीण भागातून टाळ, मृदुंग, पखवाजासह  परंपरेनुसार  शनिवारी दिंडी  दाखल झाल्या. वारकर्‍यांच्या पांडुरंगाच्या अभंगाणे सम्पूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण तयार झाले होते.*
      
मान्यवरांचे देवस्थानचे अध्यक्ष भागवत बानकर, सरचिटणीस दीपक दरंदले, पोलिस पाटील ad. सयाराम बानकर आदिनी स्वागत केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या